Cheated on woman under actor's name 
अहिल्यानगर

त्या "परश्‍या'ने घातलाय गंडा... कोणाला ते वाचा..

सूर्यकांत वरकड

नगर ः सोशल मीडियावर "सैराट' फेम आकाश ठोसर (परशा) याच्या नावाचे बनावट अकाउंट तयार करून नगरमधील महिलेला दीड लाखाला फसविणाऱ्याला सायबर पोलिसांनी पकडले. 

शिवदर्शन ऊर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25, रा. मोहननगर, मंगल आर्केड सोसायटी, प्लॉट नं. 7, पिंपरी, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. "सैराट' फेम आकाश ठोसर (परशा) याच्या नावाचे बनावट अकाउंट सोशल मीडियावर तयार करून एकाने नगरच्या महिलेशी मैत्री केली. विश्‍वास संपादन करून तो चॅटिंग करू लागला. त्यांचा संपर्क चांगलाच वाढला. दरम्यान, त्याने, "वडील आजारी असून, पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. मला पैशांची गरज असल्याने पैसे द्यावेत,' अशी मागणी केली.

महिलेने, पैसे नाहीत, दागिने असल्याचे सांगितले. नगरमधील मित्राला दागिने घेण्यासाठी पाठवितो, असे म्हणून मित्राच्या नावाखाली तो स्वत: आला आणि एक लाख चाळीस हजारांचे दागिने घेऊन गेला. या वेळी त्याने दोन मोबाईल क्रमांकांचा वापर केला. त्यानंतर महिलेने फोन करून दागिने मागण्यास सुरवात केली. तो टाळाटाळ करत होता. मात्र, त्याने अचानक फोन बंद करून ठेवल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

तिने याबाबत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासात आरोपी पिंपरी, पुणे येथील असल्याचे कळले. पोलिसांनी 24 मे रोजी त्याला पिंपरीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख चाळीस हजारांचे दागिने हस्तगत केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, 26 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान आरोपी शिवतेज नेताजी चव्हाण हा पिंपरी येथील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक नेताजी चव्हाण यांचा मुलगा आहे.


पोलिस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे यांच्या पथकाने कारवाई केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT