Cheating on a young woman for fear of making the video viral 
अहिल्यानगर

मुलीचा व्हिडिओ चित्रित करून "ब्लॅकमेलिंग"

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : जिल्ह्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतानाही आरोपींना चाप बसत नाही. श्रीगोंदा तालुक्यात घडलेली घटनाही काळिमा फासणारी आहे. एक मुलगी नराधमाची शिकार ठरली.

मोबाईलमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत एकाने नऊ महिने संबंधित मुलीवर अत्याचार केले. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. 
रामदास रोहिदास मोरे (वय 38), याच्या विरोधात श्रीगोंदे पोलिस ठाण्यात पोक्‍सो, बलात्कार, विनयभंग अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, संशयित आरोपी पसार आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीचा अंघोळीचा व्हिडिओ तयार करून तो सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी दिली होती. त्यातून दमबाजी करत त्याने मुलीवर तब्बल नऊ महिने वेळोवेळी अत्याचार केले.

काल (रविवारी) ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात धाव घेत मोरेविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईचे कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅपचे बॉस बनणार! ग्लोबल हेडपदी नियुक्ती; मेटाचा मोठा निर्णय, वाचा शाह नेमके आहेत कोण?

Pune BRT : पुण्यातून बीआरटी होणार हद्दपार; महापालिकेच्या मुख्यसभेत निर्णय, आषाढी वारीच्या पूर्वी रस्ते मोठे करणार

Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Parli Vaijnath News : लांबलेला पाऊस, पडणारे कडक ऊन व मोठ्या तापमानामुळे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेच्या वेळात बदल

Pune Expansion: पुणे महापालिकेला २३ गावांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील; पीएमआरडीएचा वादग्रस्त आराखडा रद्द

SCROLL FOR NEXT