chhindam esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : छिंदम बंधूंना अटक; जातीवाचक शिविगाळ प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम (chhindam brothers) यांना तोफखाना पोलिसांकडून (tofkhana police) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

छिंदम बंधूंना अटक

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकाला दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने त्याचा साथीदारांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चारही जणांनी अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज, किती दिवस तापमानात बदल होणार

नॉट रिचेबल नगरसेविका मध्यरात्री ठाकरेंच्या आमदाराच्या निवासस्थानी दाखल; काय घडलं? शिंदे सेनेत जाण्याची रंगलेली चर्चा

CM Devendra Fadnavis : मुंबईला कचरामुक्त शहर करणार, तिसऱ्या मुंबईत इनोव्हेशन सिटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोसमध्ये घोषणा

Kolhapur ZP : डॉ. विनय कोरे यांची कसोटी! पन्हाळ्यात सत्ता राखण्यासाठी जनसुराज्यची रणनीती निर्णायक

Udgir News : उदगीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची युती; काँग्रेस व शिंदे सेना स्वतंत्र लढणार

SCROLL FOR NEXT