The Chief Minister appreciated the farmers of Mehnduri, what did he do? 
अहिल्यानगर

मेहंदुरीच्या शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, काय केलं त्यानं असं?

शांताराम काळे

अकोले : "विकेल ते पिकेल' अभियानात मेहदुरी येथील विकास देवराम आरोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सवांद साधला.

आरोटे म्हणाले, की आमच्या अगस्ती कंपनीने आसाममधून 5 किलो निळ्या भाताचे बियाणे आणले. तेथील कृषी अधिकाऱ्यांचे पथक भेटीसाठी आले होते.

अगस्ती फार्मर्स कंपनी व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली निळ्या भाताची लागवड केली. त्यातून 120 किलो बियाणे तयार झाले. या बियाण्याचा तालुक्‍यात प्रसार-प्रचार व्हावा, यासाठी शिरपुंजे, धामणवन, सावरकुटे आणि माणिक ओझर येथील शेतकऱ्यांना सहा एकरांवर लागवड केली जाणार आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की अकोल्याचा शेतकऱ्याची ही संकल्पना चांगली असून, त्याचे कौतुक करणे आवश्‍यक आहे. या तांदळाला हमी नव्हे, तर हमखास भाव मिळाला पाहिजे, हे आमचे धोरण आहे. कृषी विभागाने संशोधन व मार्केटिंग करून शेतकऱ्यांना विकेल ते पिकेल ही योजना राबवून नावाला साजेसे काम करावे.

आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक शिवाजी जगताप, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, बाळनाथ सोनवणे, अनिता आरोटे, नवनाथ आरोटे आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT