Chinese dragon dominates Indian market
Chinese dragon dominates Indian market 
अहमदनगर

चिनी ड्रॅगनला भारतीय मार्केटमधून असे हुसकावता येईल... रोहित पवारांनी दिला उतारा

वसंत सानप

जामखेड : लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण चीनला आपला दुश्मन देश मानतो आहे. मात्र, या ड्रॅगनने आपली बाजारपेठच गिळंली आहे. त्याच्या तोंडून कसे वाचायचे, यावर आमदार रोहित पवार यांनी उतारा दिला आहे. ट्विटद्वारे त्यांनी आकडेवारीसह पट मांडला आहे.

केंद्र सरकारकडून मागील पाच वर्षांपासून 'मेक इन इंडिया' कार्यक्रम राबवला जात आहे. मात्र, चिनी उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. आपल्या व्यापारविषयक रणनीतीत कुठेतरी गंभीर चूक झाली आहे. मात्र, आपल्यावर नेहमी डोळे वटारणाऱया चीनच्या मुसक्या आपण बांधू शकतो, त्यासाठी आपल्या सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील, असं आवाहन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केलं आहे.

चीनला कसा लगाम लावू शकतो, याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. स्मार्टफोनपासून तर घरगुती व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांपर्यंत अनेक क्षेत्रांत आज चिनी उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. किंबहुना बाजारातील सुमारे 65 ते 70 टक्के हिस्सा या चिनी उत्पादनांनीच काबीज केला आहे. साधारणपणे 2014 नंतर आजपर्यंतचा विचार केला तर चीनची भारतात होणारी निर्यात ही सुमारे 15-20 टक्क्यांनी वाढलीय. देशातील स्मार्टफोनची बाजारपेठ तर चीननेच काबीज केलीय अशी आज स्थिती आहे. स्मार्टफोनची देशातील उलाढाल 1.90 लाख कोटींपेक्षा जास्त अाहे. 

इतके पैसे जातात चीनला

त्यात चीनचा वाटा तब्बल 70 ते 75 टक्के आहे. दूरसंचार साहित्याची भारतीय बाजारपेठ 13 हजार कोटींची अाहे. त्यात चीनचा हिस्सा 23 ते 28 टक्के, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती साहित्य याची उलाढाल 55 हजार कोटी अाहे. त्यातील चीनी उत्पादनांचं प्रमाण हे 10 ते 15 टक्के आहे. वाहनांचे सुटे भाग 10 ते 15 टक्के, इंटरनेट अँप 65 ते 70 टक्के, पोलाद 18 ते 23 टक्के तर औषध निर्माण क्षेत्रातील वाटा 58 ते 62 टक्के इतका आहे. 

घोडचूक लक्षात आली पाहिजे

ही संपूर्ण आकडेवारी पाहिली तर डोळे विस्फरायला लावणारी आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून मागील पाच वर्षांपासून 'मेक इन इंडिया' कार्यक्रम राबवला जात असतानाही चिनी उत्पादनं ही अशा प्रकारे भारतीय बाजारपेठ काबीज करीत असतील तर आपल्या व्यापारविषयक रणनीतीत कुठेतरी गंभीर चूक झाली आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. याकडे आधीपासूनच लक्ष देण्याची गरज होती. पण हरकत नाही आज कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची झालेली दशा आणि सीमेवर चीनकडून वारंवार केली जाणारी आगळीक याचा विचार करता ही चूक अजूनही आपण दुरुस्त करू शकतो. त्यासाठी 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' याचा आपल्याला खूप प्रभावीपणे वापर करावा लागेल.

केवळ मेक इन इंडियाचे नगारे नको

केंद्र सरकार व सर्व राज्यांनी  'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' याचे केवळ नगारे न वाजवता त्याला खऱ्या अर्थाने ताकद दिली तर बाजारातील चीनचं हे आक्रमण आपण थोपवू शकतो. प्रत्येक भारतीयामध्ये असलेली देशप्रेमाची भावनाही याला सहाय्यभूत करणारी आहे. जागतिक पातळीवर चिनविरोधात असलेल्या रोषाचाही आपल्या फायद्यासाठी खुबीने वापर करता येईल. याचा केंद्र व राज्य सरकार दोघेही विचार करतील, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.

कंपन्यांचे मूळ मालक चिनीच

याव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात चीनने आपले हातपाय पसरले आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या भारतात व्यवसाय करतात, पण त्यांचे मूळ मालक हे चिनी आहेत. चीनची भारतात होणारी निर्यात लक्षात घेतली तर त्याकडे आपल्याला संधी म्हणूनही पाहता येईल. कारण हीच उत्पादनं तयार करुन आपण चीनच्या निर्यातीला लगाम लावू शकतो. याचा राज्यातील व देशातील उद्योजक व युवांनी जरुर विचार करावा, असं माझं त्यांना आवाहन आहे. या शिवाय परदेशात काम करत असलेले मोठ्या प्रमाणातील भारतीय प्रोफेशनल पुन्हा भारतात येण्याचीही शक्यता आहे. त्यांनीही आपल्या टॅलेंटचा वापर करुन सध्या चीनकडून भारतात येतात तशी उत्पादनं सुरू करू शकले तर आपल्यासाठी ही मोठी संधी असेल. मग अशा कंपन्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत देता येईल का किंवा इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेड बेनिफिट देता येईल का, याचाही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT