police esakal
अहिल्यानगर

5 लाख मागणाऱ्या अपहरणकर्त्यांवर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई

मनोज जोशी

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव बसस्थानक परिसरात सचिन वसंत जाधव यांचे चारचाकी वाहनातून अपहरण करण्यात आले होते. पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी सिनेस्टाईल धरपकड करुन पर्दाफाश केला. अपहरकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. वाचा सविस्तर...

(Cinestyle-police-action-against-kidnappers-in-ahmednagar-marathi-news)

पोलिसांनी जाणले घटनेचे गांभीर्य

कोपरगाव बसस्थानक परिसरातून गुरुवारी (दि.१५) दुपारी अज्ञात व्यक्तींनी जाधव यांना चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवत त्यांचे अपहरण केले. जाधव यांची पत्नी भावना जाधव यांच्याकडे सुटकेसाठी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली. भावना जाधव यांनी शहर पोलिस स्टेशन गाठत रितसर तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला.

...असा केला आरोपींचा पर्दाफाश

आरोपींच्या मोबाइल नेटवर्कनुसार आरोपी आळेफाटा परिसरात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तेथे पोलिसांनी सापळा लावला. आळेफाटा येथील एका खोलीत जाधव यांना डांबून ठेवल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईलने धरपकड करुन आरोपी एकनाथ हरिभाऊ हाडवळे (रा. राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे), भाऊसाहेब विठ्ठल काळे, सीमा भाऊसाहेब काळे (दोघे रा. समर्थनगर, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे), प्रवीण रबाजी खेमनर (रा. आंबोरे, ता. संगमनेर, जि. नगर), प्रमिला महेश पवार (रा. चेहडी, ता. जि. नाशिक) यांना पोलिसांनी विविध ठिकाणांहून सहा लाख १० हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यात अपहरणात वापरलेली गाडी (एमएच- १४ जेबी ६५७२) व दोन मोबाईलचा समावेश आ‌हे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे, पोलिस कर्मचारी जी. पी. थोरात, पी. बी. बनकर, विजया दिवे, फुनकार शेख, होमगार्ड दीपक गर्जे यांनी केली.

(Cinestyle-police-action-against-kidnappers-in-ahmednagar-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: ऋतुराज गायकवाडचं द्विशतक थोडक्यात हुकलं, पण संघाला तारलं! श्रेयस, जैस्वालच्या अपयशाने फॅन्सचं डोकं फिरलं

Pune Ganeshotsav : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त; आठ हजार पोलिस तैनात

Early Signs of Colon Cancer: साधं दुखणं की आणखी काही? हार्वर्ड तज्ज्ञ सांगतात कोलन कॅन्सरची ८ सुरुवातीची चिन्हं

Malegaon Municipal Election : मालेगाव महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Latest Marathi News Updates : केडीएमसी प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस!

SCROLL FOR NEXT