The city of Rahuri will be locked down for seven days from next Thursday  
अहिल्यानगर

राहुरी शहरात येत्या गुरुवारपासून सात दिवस लॉकडाऊन

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर)  : शहरातील व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी येत्या गुरुवार (ता. ९) पासून सात दिवस स्वयंस्फूर्तीने राहुरी शहरात कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

आज (रविवारी) राहुरी पालिकेच्या सभागृहात मंत्री तनपुरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके, नीरज बोकील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, किरण सुराणा, राजेंद्र सिन्नरकर, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. प्रवीण कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, रिपाइंचे विलास साळवे, बाळासाहेब जाधव, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, अनिल कासार, अशोक आहेर, संजय साळवे, बाळासाहेब उंडे, मुख्य अधिकारी श्रीनिवास कुरे उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, दूध डेअर्‍या सकाळी व संध्याकाळी एक तास सुरु राहतील. मेडिकल दुकाने, दवाखाने सुरु राहतील. शहरात १२७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. गोरगरीब नागरिकांचे हाल होऊ नयेत. यासाठी शहरात रेशनिंगचे धान्य तत्काळ वाटप करण्याचे ठरले. स्वयंसेवी संस्थांनी गरिबांना धान्य पुरवठा करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यांना व्यापारी संघटना हातभार लावणार आहे.'

बालाजी मंदिर येथे कोरोना कोरोना केअर सेंटर पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे' असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : अर्थसंकल्पात विवाहिताना मोठा दिलासा? पती-पत्नीला आता कमी कर भरावा लागणार; नेमका काय फायदा होणार?

Mumbai News: परप्रांतीयांकडून भाजप कार्यकर्त्यांना जबर मारहाण, कुर्ल्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Tractor Driver Wins Lottery : ट्रॅक्टर ड्रायव्हरने जिंकली १० कोटींची लॉटरी, एका रात्रीत बदलले नशीब

Latest Marathi News Live Update : सोलर लावून देतो सांगून शेकडो ग्राहकांची फसवणूक, अमरावतीतील धक्कादायक घटना

विधानपरिषदेची मुदत संपताच राजकारणातून निवृत्त होणार, राजकीय परिस्थितीला कंटाळून भाजप आमदाराचा तडकाफडकी निर्णय!

SCROLL FOR NEXT