Collector Rajendra Bhosale has said If the new rules for marriage are not followed, action will be taken  
अहिल्यानगर

सावधान ! लग्नासाठी नवा नियम; पाळला नाहीत तर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाचा जिल्ह्यातील प्रसार वाढत आहे. लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमात लोकसंख्येच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाच्या मर्यादेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास आता संबंधित मंगल कार्यालय, आयोजकांवर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. टाळेबंदी शिथिल केल्यापासून लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लग्नासाठी फक्त 50 लोकांनाच परवानगी आहे. मात्र, त्यापेक्षा कितीतरी पटीने नागरिक एकत्र येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे. कोरोना नियंत्रणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोर केल्या आहेत.

लग्नसमारंभात 50 पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र दिसल्यास संबंधित मंगल कार्यालय परिसरातील पोलिस ठाण्यात कार्यालयाच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमास गर्दी झाल्यास आयोजकांवर गुन्हा दाखल केला जाईल. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना कारवाईचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT