The Collector of the town, Dr. Rajendra Bhosale 
अहिल्यानगर

नगरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेंद्र भोसले

अमित आवारी

नगर ः नगरच्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली आहे. या संदर्भातील आदेश आज मंत्रालयातून काढण्यात आला. मात्र, जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या बदलीचे स्थान अद्यापि दर्शविण्यात आलेले नाही.

डॉ. भोसले यांनी या पूर्वी तीन महिने नगरचे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची चांगलीच माहिती आहे. काम करण्यासाठी नगर जिल्हा तसा सोपा आहे. परंतु तितकाच जिकिरीचाही आहे. हे सर्व अधिकारी जाणून असतात. डॉ. भोसले यांनी या पूर्वी येथे काम केलेले असल्याने त्यांना सर्व प्रकारची माहिती आहे.  

मावळते जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कामाच्या माध्यमातून चांगलाच ठसा उमटवला होता. पदार्पणातच त्यांनी सीना नदीवरील अतिक्रमणे काढून सर्वसामान्य नगरकरांचे कौतुक मिळवले होते. त्याच बरोबर जिल्हा क्रीडा संकुलातील एमआर ट्रेड सेंटरबाबत घेतलेली भूमिका असेल, लॉकडाउनच्या सुरवातीला त्यांनी केलेले काम चर्चेचा विषय ठरला. द्विवेदी यांची बदली होऊ नये यासाठी यापूर्वी "सकाळ'च्या माध्यमातून नागरिकांनी सह्यांची मोहीमही चालविली होती. 

डॉ. भोसले हे पुणे येथे अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी म्हणून तीन महिने काम केले. या काळात त्यांनी प्रशासकीय कामांचा मापदंड घालून देण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यानंतर त्यांची बदली झाल्याने त्यांचे हे नियोजन मागे राहिले. डॉ. भोसले पुन्हा बदलून आल्याने महसूल प्रशासनात शिस्त येईल. डॉ. भोसले हे सन २००८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

Panhala Forest Ban : पन्हाळ्यातील वनक्षेत्रात पर्यटकांना नो-एन्ट्री! 'या' तारखेपर्यंत वन विभागाकडून नाकाबंदी, काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : नागपुरमध्ये भाजप उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार

Jalgaon Municipal Election : जळगावात युतीची गाडी घसरली? जागावाटपावरून खडाजंगी, गुलाबराव पाटील तावातावात बाहेर!

SCROLL FOR NEXT