ayurved 
अहिल्यानगर

आयुर्वेद महाविद्यालय होणार कोव्हिड सेंटर 

अमित आवारी

नगर : अहमदनगर शहरातील बुथ हॉस्पिटल हे सेवाभावी वृत्तीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. कोरोना काळात या हॉस्पिटलने कोव्हिड पॉझेटिव्ह रुग्णांशी भावनिक नाते जोडल्याने हे रुग्ण कोव्हिड निगेटिव्ह झाले. बुथचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. या हॉस्पिटलचे विचार पॉझेटिव्ह असल्याने तेथून बाहेर पडणारे रुग्ण निगेटिव्ह येत आहेत. हाच आदर्श नगरमधील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाने घ्यावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व गुरू आनंद फाउंडेशनतर्फे नगरमधील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात येत्या दोन दिवसांत कोव्हिड सेंटर उघडण्यात येणार आहे. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांच्या संकल्पनेतून हे सेंटर सुरू होत आहे. बुथ हॉस्पिटल प्रमाणे अत्यल्प दारात हे सेंटर काम करेल. या सेंटरमध्ये 30 खाटांची सोय करण्यात आली आहे. त्यादृष्टीने आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी बुथ हॉस्पिटलला भेट दिली तसेच तेथे कोरोना रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. बुथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक देवदान कळकुंबे यांनी उपस्थितांना बुथ हॉस्पिटल व ते देत असलेल्या सेवांची माहिती दिली. 
  

कळकुंबे म्हणाले, बुथ हॉस्पिटलमधील प्रत्येक डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी मनापासून कोव्हिड रुग्णांची सेवा केली. त्यामुळेच येथून निगेटिव्ह होऊन गेलेले रुग्ण पुन्हा कधीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले नाहीत. बुथ हॉस्पिटलमधील रुग्ण सेवा हे एक "टीम वर्क' आहे. रुग्ण सेवा देताना संघ भावनेतून काम करा. रुग्णांचा विश्‍वास संपादन करा. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता कक्ष नसतानाही 90 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ कोरोना रुग्ण बरे करण्यात यश मिळविता आले. कोरोना काळात 2-3 रुग्णांपासून सेवेला सुरवात केली. आता 125 रुग्ण उपचार घेत आहेत, असे मार्गदर्शन कळकुंबे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT