College classes need to be started with caution 
अहिल्यानगर

खबरदारी घेऊन महाविद्यालयांचे वर्ग सुरू करणे गरजेचे

सचिन सावंत

शेवगाव (अहमदनगर) : ऑनलाइन शिक्षण हे वर्गातील शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, तसेच नेटवर्कच्या अडचणीमुळे हुशार अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन वर्ग सुरू करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय फडके यांनी केले.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या येथील न्यू आर्टस महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत मास्कवाटप कार्यक्रमात फडके बोलत होते. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. विजय बानदार, जगदीश आरेकर, प्रा. संजीवनी नवल, प्रा. किशोर मरकड आदी उपस्थित होते. 

प्राचार्य कुंदे म्हणाले, सरकारच्या निर्णयानुसार अनेक महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांनी व पालकांनी योग्य ती खबरदारी घेत प्रशासनास सहकार्य करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता राखावी, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. उपप्राचार्य डॉ. विजयकुमार बानदार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मीनाक्षी चक्रे यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषण कोरोनापेक्षाही घातक, 'या' लोकांना ताबडतोब शहर सोडण्याचा सल्ला

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना! 'जमिनीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार';खोटे मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावली..

Latest Marathi News Live Update : ..अखेर प्रशासनाला आली जाग; कारखानदार-संघटनांची आज महत्त्वाची बैठक

Daily horoscope: आजचे राशिभविष्य-३ नाेव्हेंबर २०२५

महिला वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नव्हतं, दीप्तीने केला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT