This commitment was given to Jamkhedkar by Rohit Pawar after the corporator left the BJP 
अहिल्यानगर

नगरसेवक परतले ः रोहित पवारांनी जामखेडकरांना दिली ही कमिटमेंट

सकाळ वृत्तसेवा

जामखेड ः "नगराध्यक्षासह नगरसेवकांनी मीडियाच्या माध्यमातून माझ्याबरोबर विकासकामे करण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. येथील नागरिकांनी राष्ट्रवादीकडे पाहिले म्हणूनच हे सर्व नगरसेवक निवडून आले. काही काळ ते भाजपात गेले असले तरी ते स्वेच्छेने परत आले. त्यांचे आपण स्वागत. आपलं शहर स्वच्छ सुंदर असाव, शहराचा विकास व्हावा म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आपली भूमिका आहे," अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी पक्षात आलेल्या नगरसेवकांचे स्वागत केले.

शुक्रवारी (ता. 19) जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह अकरा नगरसेवकांनी आमदार रोहित पवार यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.

यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक प्रीती राळेभात, संदीप गायकवाड, गुलचंद अंधारे, सुमन शेळके, जाकिया शेख, लता गायकवाड, सुरेखा राळेभात, मेहरुन्निसा कुरेशी, शामिर सय्यद,
ऋषिकेश बांबरेसे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत -जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्यांची प्रतिमा चांगली, त्यांनाच...

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले ," ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. लोकांच्या हिताचे काम करीत आहेत, स्व:हित बाजूला ठेवून लोकहीताची कामे करीत आहेत अशा व्यक्तींना आपण ताकत देणार आहोत, विकासाच्या कामात सहकार्य करणार आहोत. जामखेड मध्ये अनेक अडचणी आहेत. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. उत्पन्न घटले आहे. शहरात 'ट्राफिक' ची सर्वात मोठी अडचण आहे.

पाणी योजना मार्गी लावायचीय

पुढील काळात या सर्वांमधून मार्ग काढायचा आहे. पाणीपुरवठ्याची मंजूर केलेली 116 कोटी रुपये योजना मार्गी लावायची आहे. निवडणुकीमध्ये कोणी कितीही पेपर दाखवले असले तरी जामखेडची पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडी सरकारने मंजूर केली. उन्हाळ्यात पाण्याची अडचण होती. काही काळ अडचण राहिली. जेवढ्या लवकर टॅंकर देता येतील, ते देण्याचे काम आपण केले.

तलावातील खराब पाणी असल्याने टँकर भरण्यासाठी स्वतंत्र विहिरी अधिग्रहण केल्या. व्यक्तिगत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणीटंचाईच्या काळात टँकर लावले .बारा ते पंधरा दिवसानं जामखेडला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती .यापुढे अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न राहील. शहरात गटार आणि रोडची अवस्था दयनीय आहे. ती कामे करायची आहेत. याकरिता सर्वांना एकत्र बरोबर घेऊन शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला प्रयत्न राहील.

शॉपिंग मॉल, बस स्थानक शॉपिंग कंपलेक्स करायचे असून बस स्थानकाचे सुशोभीकरण मंजूर केलेले आहे. क्रीडा संकुलाला ही निधी टाकला होता. मात्र थोडा विलंब लागेल पण काम मार्गी लागेल.

जामखेड शहरातील प्रभाग निहाय शौचालय उभारायचे आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करायचे आहे.

उद्याच्या काळात आपलं गाव सुंदर स्वच्छ असायला हवं उगाच राजकारण करायचे नाही पुढील काळात योग्य नियोजन करायचे आहे. एकत्रित शहराचा विकास करायचा आहे. आता त्या ठिकाणी गेलेली ही टीम परत आलेली आहे. एकत्रित लोकांची सेवा करून शहराच्या विकासाचे विविध स्तरावर रखडलेले प्रस्ताव मला हक्काने सांगा हे आपण मार्गी लावू अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली.

यावेळी नगरसेवक समीर सय्यद यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक ऋषिकेश भांबरे यांनी केले.

ते आमचेच

पक्ष प्रवेश केलेले सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यांनी काही काळ भाजपात घालवला असला तरी नागरिकांनी त्यांना घड्याळाचे चिन्ह पाहूनच निवडून दिलेले आहे.ते सर्वजण स्वःइच्छेने बरोबर आले आहेत. 

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: इशान किशनच्या झारखंडने जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी; पुण्यात झालेल्या फायनलमध्ये कर्णधार ठरला हिरो

Nitish Kumar Hijab Incident : हिजाब घटनेनंतर नितीश कुमारांच्या जीवाला धोका? ; यंत्रणांनी सुरक्षा वाढवली!

Crime: भयंकर! ४० वर्षीय प्रेयसीला २७ वर्षीय प्रियकराकडून मूल हवं होतं; तरुणाच्या पत्नीला कळलं अन् भलतंच कांड घडलं!

Latest Marathi News Live Update : निलंबित कर्मचाऱ्यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावे - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Viral Video Fact Check: बेघर होऊन भीक मागताना सापडलेली महिला खरंच क्रिकेटर सलीम दुर्रानी यांची पत्नी? काय आहे सत्य?

SCROLL FOR NEXT