MLA Nilesh Lanke Esakal
अहिल्यानगर

'आमदार लंकेंकडून मारहाण नाही', राहुल पाटलांचे म्हणणे; पोलिसांकडे मात्र तक्रार

सकाळ डिजिटल टीम

पारनेर (जि. नगर) : आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी राहुल पाटील यांना मारहाण केल्याची तक्रार रुग्णालयाच्या अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच पारनेर पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा प्रकार घडला नसून, मला कोणतीच तक्रार करावयाची नाही व पुढे काही वाढवावयाचे नाही, असे त्यांनी सांगितले. (MLA Nilesh Lanke Beaten up health worker)

जिल्हा शल्यचिकित्सक व पारनेर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जावर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांची सही असून, तो अर्ज सोशल मीडियावरही व्हयरल झाला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, काल (ता. ४ ) रात्री साडेआठ वाजता तहसीलदार व रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉ. श्रद्धा अडसूळ यांच्या आदेशानुसार कोरोना लसीचे टोकण वाटप करण्यात आले होते. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता आमदार व डॉ. कावरे यांनी टोकण वाटप करणारे आरोग्य कर्मचारी कनिष्ट लिपिक राहुल पाटील यांना घरून बोलावून घेतले. त्यांच्यावर टोकण विकल्याचे आरोप करूण कोणतीही शहानिशा न करता आमदार लंके यांनी मारहाण केली. तसेच त्या वेळी कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी यांनाही शिवीगाळ केली. ही घटना गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्या समोरच घडल्याचेही अर्जात म्हटले आहे. या तक्रार अर्जाबाबत आरोग्य अधिकारी डॉ. उंद्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूणही त्यांनी फोन घेतला नाही.

आमच्या समोर मारहाण झालेली नाही. मात्र आमच्याकडे तक्रार अर्ज आला आहे. त्यानुसार मी स्वत: आरोग्याधिकारी डॉ. मनीषा उंद्रे यांच्याकडे जाऊन चौकशी केली, तर त्यांनी मला तक्रार करावयाची नाही. मी विचार करून सांगते, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल नाही. फक्त तक्रार अर्ज आलेला आहे.

घनश्‍याम बळप, पोलिस निरीक्षक

मला आमदार नीलेश लंके यांनी कुठलीही शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही. मी तशी तक्रारही कोठेच केली नाही. मात्र समाजमाध्यमांवर मला मारहाण झाल्याची पोस्ट व्हयरल करून माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कार्यवाही करावी.

राहुल पाटील, कनिष्ठ लिपिक, ग्रामीण रुग्णालय, पारनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT