Computer "ignorant" employees! 
अहिल्यानगर

नगर झेडपीचे कर्मचारी "अडाणी', म्हणून खासगीवाल्याला बोलावणी  

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचाऱ्यांना संगणकाची जुजबी माहितीही नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, सरकारी नोकरीसाठी संगणकसाक्षर असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना सरकारने 2009पर्यंतची मुदत देऊन संगणकसाक्षर होण्याची सूचना केली होती. त्यानुसार, सर्वांनी संगणकाच्या एमएच-सीआयटी व इतर तत्सम परीक्षा देऊन तसे प्रमाणपत्रही मिळविले.

ते आपल्या कार्यालयांना सादर केले. मात्र, जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी कागदोपत्रीच संगणकसाक्षर झाले. प्रत्यक्षात हे काम येत नसल्याने त्यांनी त्यांची वैयक्तिक माणसे नेमली आहेत. ही माणसेच सध्या जिल्हा परिषदेत "बॉस' झाल्याचे चित्र आहे. 

जिल्हा परिषदेच्या बदलीप्रक्रियेतून सुटका मिळविण्यासाठी काही प्राथमिक शिक्षकांनी प्रशासनाला अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार राज्यात गाजला होता. आता जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी संगणकसाक्षर असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याची चर्चा आहे. मात्र, कोणत्या विभागात संगणकनिरक्षरांचा भरणा आहे, त्यांची नावे घेण्याचे कर्मचारी टाळत आहेत. 

संगणकसाक्षरालाच आता सरकारी नोकरी मिळते. तसेच, पूर्वी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने 2009पर्यंत संगणकसाक्षर होण्याची संधी दिली होती. अनेकांनी त्या वेळी संगणकसाक्षर होण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही जण एमएच-सीआयटीसह तत्सम परीक्षांत वारंवार अनुत्तीर्ण झाले.

अखेर इतरांच्या मदतीने त्यांनी कसे तरी प्रमाणपत्र मिळविले. मात्र, प्रत्यक्षात ते संगणकाबाबत अज्ञानीच राहिले. अर्णा संगणकावर कामकाज येत नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. त्यावर काहींनी खासगी व्यक्तींचा आधार शोधला. त्यांना वैयक्तिकरीत्या पैसे देऊन काम करून घेऊ लागले. 

काही कार्यालयांतील कर्मचारी इतर सहकाऱ्यांची मदत घेऊन काम करीत आहेत. हा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासह तालुका पातळीवरील कार्यालयांमध्येही सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, संगणकनिरक्षर अधिकाऱ्याचीच प्रशासनाकडून मोक्‍याच्या ठिकाणी नियुक्ती केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या संगणक अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रांची प्रशासनाने पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे. 

 
जिल्हा परिषदेत नव्याने भरती होणारा कर्मचारी संगणकाची एमएच-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच, जुन्या कर्मचाऱ्यांना 2009पर्यंत संगणकसाक्षर होण्यासाठी शासनाने मुदत दिली होती. त्यात सर्वच संगणकसाक्षर झाले आहेत. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT