maharashtra police esakal
अहिल्यानगर

पोलिस रिक्रूटमेंटच्या परीक्षार्थींची ससेहोलपट | Ahmednagar

सकाळ वृत्तसेवा



पारनेर (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य पोलिस रिक्रूटमेंटमार्फत आज (ता. ११) घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्राचा पत्ता व नावात चूक झाल्याने, अनेक परीक्षार्थींची ससेहोलपट झाली. त्यातच एसटी बस बंद असल्याने अनेकांचे मोठे हाल झाले. अनेकांनी परीक्षा केंद्रे दूर मिळाल्याने दांडी मारली.

परीक्षार्थींना पत्ताच सापडेना

आज महाराष्ट्र राज्य पोलिस रिक्रूटमेंटतर्फे जेल पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा होती. या परीक्षेसाठी राज्यात विविध ठिकाणी केंद्रे दिली होती. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सात केंद्रे होती. त्यांतील काही केंद्रांच्या नावात किंवा पत्त्यात चूक झाली होती. सुप्यातील एमईटी इंग्लिश मीडियम स्कूल हे या परीक्षेसाठी केंद्र नियुक्त केले होते. मात्र, परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर माऊली इंग्लिश मीडियम स्कूल, पारनेर असा पत्ता लिहिला आहे. त्यामुळे परीक्षार्थी थेट पारनेर येथे गेले. तेथे ही शाळाच नसल्याने त्यांचा संभ्रम झाला.
शिवाय, या नावाची शाळा तालुक्यातच नाही, असाही संभ्रम झाला. त्यातच राज्यभरातून आलेल्या मुलांना हा परिसर नवीन, तसेच सध्या एसटी बसचा संप असल्याने परीक्षार्थींना अडचणी आल्या.

अधिकाऱ्यांचे तासाभराने आगमन

एमईटी इंग्लिश मीडियमकडे परीक्षा केंद्रासाठी फक्त आठ वर्गखोल्या उपलब्ध आहेत. प्रत्येक खोलीत २४ या प्रमाणे १९२ परीक्षार्थींची बैठकव्यवस्था आहे व तेवढ्याच मुलांचे केंद्र द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, परीक्षा घेणाऱ्या आयोजकांनी त्यांना थेट २० वर्ग व ४८० मुलांची परीक्षा घेण्याबाबत कळविले.

परीक्षा घेण्यासाठी संबंधित विद्यालयास प्रतिविद्यार्थी ३० रुपये, तर काही केंद्रचालकांना ४५ रुपये देतो, असे सांगितले. मात्र, कोणालाच मोबदला देण्यात आला नाही. इतकेच नव्हे, तर प्रश्नपत्रिका पाठविल्या, मात्र, त्याबरोबर कोणीही अधिकारी नव्हते. अधिकारी तासाभराने उशिरा आले.

''सौजन्य म्हणून आम्ही पारनेर येथे चुकीने गेलेल्या मुलांना पारनेर येथून सुपे येथे येण्यासाठी आमच्या शाळेच्या पाच बस पारनेर येथे पाठविल्या. तेथून मुलांना मोफत आणण्याची सोय केली. पारनेर बसस्थानकावर तसा फलकही लावला.'' - अनिकेत पठारे, अध्यक्ष, एमईटी इंग्लिश मीडियम स्कूल, सुपे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT