Congress cauldron in front of Shrirampur Municipality for water 
अहिल्यानगर

पाण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर काँग्रेसचा हंडा मोर्चा

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : "पाणी उशाला, कोरड घशाला,' "श्रीरामपूरकरांना नियमित व स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे,' "पाणी आमच्या हक्काचे' अशा घोषणा देत येथील नगरपालिकेसमोर कॉंग्रेसच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक संजय छल्लारे, संजय फंड यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. शहरात नियमित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसून, अनेक भागांत दूषित पाणी येते. पालिकेकडून अनेकदा रात्री-अपरात्री, सोशल मीडियाद्वारे संदेश पाठवून अचानकपणे "उद्या पाणी येणार नसल्या'चे सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. शहरात नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, पाणीपुरवठ्याबाबत काही निरोप असल्यास नगरसेवकांना तातडीने पाठवावा. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. पाण्याची प्रभागनिहाय तपासणी करून पाण्याचा दर्जा सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करून पालिकेच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा अनिल कांबळे यांनी दिला.

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवक फंड व छल्लारे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत विविध मागण्यांचे निवेदन दिले. दिलीप नागरे, सुभाष तोरणे, दीपक कदम, रितेश एडके उपस्थित होते.

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळित झाली असून, त्याला पालिका जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माजी उपनगराध्यक्ष कांबळे यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: निवडणुकीच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त, पोलिसही चक्रावले; कारवाईत एकाला अटक!

Tathawade Land Scam : सरकारी जमीन गिळंकृत करण्याचा मोठा कट; सह दुय्यम निबंधकासह २७ जणांवर गुन्हा

Margashirsha Month 2025: यंदा मार्गशीर्ष महिना कधी पासून सुरु आहे? जाणून घ्या पूजा विधी अन् महत्त्व

Latest Marathi Breaking News Live : पुण्यातील मनसेचे नेते घेणार राज ठाकरेंची भेट

Pune Protest : पुण्यातील पथारी व्यावसायिकांचे आंदोलन; अतिक्रमण कारवाईविरोधात आवाज उठवणार

SCROLL FOR NEXT