Congress protests against Modi at Sangamnera
Congress protests against Modi at Sangamnera 
अहमदनगर

मोदी सरकारविरोधात संगमनेरात काँग्रेसची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः भारत-चीन सीमेवर गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या 20 सैनिकांना मानवंदना देत तालुका काँग्रेसच्यावतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारच्या कुचकामी धोरणाविरुध्द सोशल डिस्टन्सचे पालन करुन मूक निदर्शने करीत निषेध नोंदविला.

कुरापती करणार्‍या चीन विरोधात देशाच्या पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. नवीन नगर रोड येथील महात्मा गांधी यांच्या तैलचित्राजवळ तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने मेणबत्ती प्रज्वलीत करुन 20 जवान शहिदांना शहिदों को सलाम अंतर्गत आदरांजली अर्पण करण्यात आली. मोदी सरकारने या हल्याबाबत चुप्पीचे धोरण स्वीकारुन देशातील नागरिकांना अंधारात ठेवले.

डॉ. तांबे म्हणाले, या घुसखोरी प्रकरणी 56 इंचाच्या छातीने सोईस्कर मौनव्रत धारण केले आहे. सरकारने जनतेला सत्य सांगून,सीमेवर कुरबुरी करणार्‍या चीनला देशाच्या नेतृत्वाने कणखर भूमिका घेत धडा शिकविला पाहिजे. काँग्रेस पक्षासह संपूर्ण देश अशा संकटात सरकारच्या पाठिशी आहे.

कोरोनाच्या संकटात गोरगरिब व हातावर पोट भरणार्‍यांना थेट मदत दिली पाहिजे. आर्थिक मंदी वाढवणाऱ्या देशातील अस्थिरतेबाबत सरकार उपाययोजना करीत नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. 

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक, सुरेश थोरात, संतोष हासे, अर्चना बालोडे, निखील पापडेजा, निर्मला गुंजाळ, नितीन अभंग, गणेश मादास, नवनाथ आंधळे, अविनाश सोनवणे, तान्हाजी आहेर, सोमेश्‍वर दिवटे, किशोर टोकसे, श्रेयस कर्पे, शेखर सोसे, अनिस शेख, बाळासाहेब पवार आदि उपस्थित होते.

मोहिमेला तरुणाईचा उदंड प्रतिसाद
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार सकाळी 11 ते 12 या वेळेत राज्यातील लाखो तरुणांनी स्पिक अप इंडिया मोहिमेत सहभाग घेत, केंद्र सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. देशाचे संरक्षण, तरुणांना नोकर्‍या, भाववाढ, आर्थिक मंदी, जातीयवाद, कोरोना संकट याकडे लक्ष देण्याच्या व मन की बात थांबवा, काम की बात करा अशा सूचना तरुणांनी केल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT