Corona closes MLA Lanka's Janata Darbar 
अहिल्यानगर

जनता दरबार बंद पडल्याने आमदार लंके यांचे बिगीन अगेन

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ः कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने सगळीकडे सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी अाहे. आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यातील जनता दरबारावरही गंडांतर आले. यावर लंके यांनी उपाय काढला आहे. तालुक्यातील देसवडे येथून या उपक्रमास प्रारंभही करण्यात आला.

या उपक्रमाबाबत लंके म्हणाले, कोरोनामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले अाहे. गावागावातील सर्वाजनिक व वैयक्तिक प्रश्न थेट तालुक्यातील गावागावात जावून सोडविणार आहे. निवडणुकीचा आखाडा जिंकण्यासाठी जी काही आश्वासने दिली आहे, ती टप्पाटप्पाने पुर्ण केली जातील. रात्रंदिवस ९ वर्षात मोठा संघर्ष केला. त्याचे हे फळ आहे.

गावांचे मुल्यमापन मतांनी ठरावात येणार नाही, त्यामुळे गावच्या विकास महत्वाचा आहे. त्यामुळे ज्या गावात विकासाचा कामे झाली नाही, त्याठिकाणी कामे मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे. खोलात गेल्यावर मनस्थाप होतो. मी तुमचा जनसेवक आहे त्यामुळे सामाजिक व सार्वजनिक प्रश्नाबरोबर वैयक्तिक प्रश्न सोडवू.
कोरोनाच्या आजारावर मात करत आता थेट गावात जावुन प्रश्न सोडावे लागणार आहेत. सर्वांनी स्वतःची सह इतरांची काळजी घेवुन आपले जीवन व्यतीत करावे लागणार आहे.

आदिवासी भिल्ल समाजासाठी पाण्याची टाकी,देसवडे टेकडवाडी येथे बंधारे,पंतप्रधान ग्रामसडक किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन काळेवाडी रस्ता पुर्ण केला जाईल, असे आश्वासन आमदार लंके यांनी दिले. 

या वेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीना शेटे, गटविकास अधिकारी किशोर माने,शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, राजेंद्र चौधरी, सरपंच राहुल झावरे, उद्योजक विजय औटी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हायड्रोलिक लिफ्ट, कंट्रोल रूम, स्प्रिंकलर…; तरीही लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, कोट्यवधी खर्चून गुजरातचा 'हायटेक तराफा' फुस्का!

Devendra Fadnavis: फक्त खरी नोंद असेल त्यालाच... GR नंतर फडणवीसांचा मराठा-ओबीसी आरक्षणावर मोठा खुलासा!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानांच्या गणपतीची मिरवणूक वेळेत संपली; इतर मंडळांच्या मिरवणुकीला लागतोय वेळ

Shubman Gill होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार, केवळ औपचारिकता बाकी? रोहित शर्माच्या भविष्याबाबत चर्चेला उधाण

Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीने मोडला रेकॉर्ड, २९ तासांनंतरही सुरू, पोलिसांचे नियोजन कोलमडले

SCROLL FOR NEXT