corona covered the snare ... The number of the city reached 21 
अहिल्यानगर

कोरानाने आवळला फास...नगरचा आकडा पोचला 217 वर !

सकाळ वृत्तसेवा

 नगर ः बहुतांश मुंबईच्या कनेक्‍शनमुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फास दिवसेंदिवस आवळताना दिसत आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधितांची भर पडली. यात संगमनेर चार, शेवगावमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 217 वर पोचला आहे. आज आणखी 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 136 झाली आहे. 

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा सिलसिला आता थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार पाच बाधित रुग्ण आढळून आले. मुंबईहून संगमनेर येथे आलेली 40 वर्षांची महिला, संगमनेर येथील खासगी प्रयोगशाळेत तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय मुंबईहून आलेल्या मिरी रोड (शेवगाव) येथे आलेल्या 22 वर्षांच्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. उर्वरित 13 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 

जिल्ह्यातील रुग्णसंख्या 217 वर पोचली आहे. त्यात महापालिका क्षेत्र 47, नगर जिल्हा 111, अन्य राज्य दोन, अन्य देश आठ, अन्य जिल्ह्यातील 49 जणांचा समावेश आहे. 


आणखी 15 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यातील आणखी 15 व्यक्तींनी कोरोनावर मात मिळवली. त्यातील त्यातील 13 व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटलमधून, तर दोन व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला. यात संगमनेर सहा, राहाता, कर्जत, अकोले प्रत्येकी दोन, नगर शहर, शेवगाव, पारनेर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT