Corona is growing but devotees are flocking for Shanidarshan  
अहिल्यानगर

काय म्हणावं आता ! लॉकडाऊनची धास्ती पण शनिशिंगणापुरात नियम धाब्यावर बसवून दर्शनासाठी गर्दी

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यानंतरही नियम धाब्यावर बसवून अनेक भाविक शनिदर्शनासाठी येत आहेत. येथील नागरिकांनाही कोरोनाची धास्ती नाही. मात्र, पुन्हा लॉकडाउन होऊन व्यवसाय बंद पडतो की काय, याचीच काळजी लागल्याचे चित्र आहे. 

कोरोना संसर्गामुळे मार्च 2020 मध्ये शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी मंदिर बंद केले होते. तब्बल 10 महिने गावातील सर्व व्यवहार बंद होते. त्याचा परिणाम गाव व परिसराच्या अर्थकारणावर झाला. कधी नव्हे ते शनिदेवाची झोळी पूर्ण रिती झाली. राज्य सरकारने दिवाळी पाडव्याला देवालये खुली केली. त्यानंतर येथील शनिचौथरा दर्शनासाठी खुला झाला. मागील दोन महिने गर्दीचा ओघ तसा कमीच होता. मात्र, एक जानेवारीपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत गेली. त्यामुळे बंद व्यवसायही सुरळीत झाले. 13 मार्च रोजी शनिअमावस्या असून, त्याची तयारी व्यावसायिकांनी आतापासूनच सुरू केली आहे. 

मागील पंधरवड्यात देवस्थानच्या काही दुकानांचा लिलाव झाला. त्यासाठी लाखो रुपये व्यावसायिकांनी खर्च केले. मात्र, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, राज्य सरकारने अनेक निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. शनिशिंगणापुरातही मोठ्या संख्येने भाविक येत असून, नियम धाब्यावर बसवून ते दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. विनामास्क फिरत आहेत. दुसरीकडे, ग्रामपंचायत पदाधिकारी व विश्‍वस्त मंडळही बघ्याची भूमिका घेत आहे. शनिशिंगणापूरकरांना कोरोनाची पर्वा नाही. मात्र, पुन्हा लॉकडाउन होऊन व्यवसाय बंद पडतो की काय, याचाच धसका व्यावसायिकांनी घेतल्याचे दिसत आहे. 

मास्क असणाऱ्या भाविकांनाच दर्शनासाठी आत सोडले जाते. शासनाच्या सर्व नियमांचे देवस्थानतर्फे पालन केले जात आहे. 
- नितीन शेटे, कार्यकारी अधिकारी, शनैश्‍वर देवस्थान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT