Heart Sakal
अहिल्यानगर

कोरोनानंतर... हृदय मोलाचं !

‘पोस्ट कोरोना’ या विषयावर काथ्याकूट

मुरलीधर कराळे

अहमदनगर : कोरोनानंतर शरीरात होणाऱ्या बदलांबाबत अनेक प्रकारची चर्चा होते. डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले जाते. अनेकांना भीतीही वाटते. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या, स्टिरॉईड इंजेक्शन आदी औषधे घेतल्याने दुष्परिणाम होतात का, याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. तथापि, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी हृदयाची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आपले फॅमिली डॉक्टर वारंवार सल्ला देतातच. प्रत्येकाने हृदय मोलाचे आहे, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

कोरोनानंतरच्या आजारांवर अनेकदा चर्चा होते. ‘पोस्ट कोरोना’ या विषयावर काथ्याकूट होतो. डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा येणे, असे प्रकार उन्हाळ्यात वाढले तरीही लोक घाबरून जातात; मात्र घाबरून जाण्याची गरज नाही. अनेकदा नैसर्गिक पद्धतीनेही तसे होऊ शकते. तथापि, ‘रिस्क’ नको म्हणून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनानंतर ५० टक्के लोकांमध्ये हृदयावर काही ना काही ताण आला. हृदय शरीराचे पंपिंग स्टेशन आहे. येथूनच शरीराला ऑक्सिजन पुरविला जातो. फुफ्फुसातून ऑक्सिजन हृदयात जातो. तेथून रक्तात मिसळतो.

ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात प्रवाहित होते. कोरोना विषाणूमुळे थेट फुफ्फुसालाच संसर्ग झाल्याने, फुफ्फुसाची क्षमता कमी झाली. परिणामी, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली. या सर्व प्रक्रियेत हृदयाशी निगडितच सर्व गोष्टी घडल्यामुळे, कोरोनानंतरही हृदयाची काळजी महत्त्वाची ठरली आहे.

कोरोनानंतर हृदयावर जाणवणारे परिणाम

  • लंग फायब्रोसिस होऊ शकतो

  • दोन टक्के लोकांना दम लागतो

  • रक्तातील साखर वाढू शकते

  • रक्तदाबाशी निगडित गोळ्याही सुरू होऊ शकतात

  • रक्तात गाठी दिसू लागतात

  • तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढू लागले

  • हृदयाची कार्यक्षमता घटते

अशी घ्यावी काळजी

  • हिरव्या पालेभाज्या आहारात वाढवा

  • साखरेची तपासणी गरजेनुसार आवश्यक

  • नियमित शारीरिक व्यायाम आवश्यक

  • श्वसनाशी निगडित व्यायाम करावेत

  • तक्रार जाणवल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

  • पाणी भरपूर प्यावे रक्तदाबाची तपासणी गरजेनुसार हवी

  • वर्षातून एकदा तरी महत्त्वाच्या तपासण्या कराव्यात

  • धूम्रपानाची सवय सोडा ताजे अन्न खा - सकारात्मक विचार करा

कोरोनाचा असाही फायदा

  • कोरोनामुळे मास्क वापरणे सक्तीचे झाल्याने श्वसनाशी निगडित आजार घटले.

  • वारंवार हात धुतल्याने अनेक आजार घटले

  • स्वच्छ पाण्यावर भर असल्याने विषाणूजन्य आजार कमी

  • डासांपासून संरक्षणाला प्राधान्यामुळे डेंगी, चिकुनगुन्यासारखे आजार कमी

  • प्रत्येक रुग्णालयात इतर आजारांचे रुग्ण घटले

कोरोनानंतर हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना काळात केलेल्या तपासण्या, स्टेरॉईड, इंजेक्शन यांमुळे काही रुग्णांमध्ये बदल जाणवत आहेत. तथापि, अनेक आजारही कमी होत आहेत; मात्र हृदयाशी निगडित आजारांकडे दुर्लक्ष करू नये. आवश्यकतेनुसार तपासण्या, नियमित व्यायाम, श्वसनाचे व्यायाम हे रुग्णांना चांगला फायदा देतात.

- डॉ. बापूसाहेब कांडेकर, हृदयविकारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT