Corona-infected patient has to be taken out of the board! 
अहिल्यानगर

अंत्ययात्रेबाबतही आली नियमावली, कोरोनाबाधिताला घराबाहेर लावावा लागेल बोर्ड!

सकाळ डिजिटल टीम

नगर ः हा हा म्हणता कोरोनाने फास आवळला आहे. नगर शहरासह जिल्ह्यातही प्रादूर्भाव वाढतो आहे. जिल्हा प्रशासनाने नियम कडक करण्यास सुरूवात केली आहे. नगर शहरातील सहा भागात मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत.

नागापूर, सिव्हिल हडको, बालिकाश्रम रस्त्यावरील काही भागात हे कंटेन्मेंट झोन केले आहेत. ज्या भागात कोरोना बाधित रूग्ण सापडतात. त्याच भागात हे झोन जाहीर होतात. त्यामुळे परिसरातील लोकांना त्याचा त्रास होत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. चित्रपटगृह, हॉटेल हे पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. विवाहासाठीची मर्यादा 50 व्यक्‍तीची कायम ठेवली आहे.

अंत्यसंस्कारासाठी ठराविक व्यक्‍तींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी 50 व्यक्‍तींची मर्यादा ठेवण्यात आली आहे. कोरोना रुग्ण घरी विलगीकरण कक्षात राहत असल्यास त्या ठिकाणी 14 दिवस फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. 

त्यसंस्कारासाठी 20 व्यक्‍तींना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्‍तींना एकत्र येत येणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT