Coronavirus File Photo
अहिल्यानगर

दुसऱ्या लाटेत संगमनेरची वाताहत, १७४ गावांत कोरोना संसर्ग

आनंद गायकवाड

संगमनेर ः सुमारे वर्षभरापूर्वी संगमनेर तालुक्यात कोविड चोरपावलांनी आला. पहिल्या लाटेत संक्रमणापासून दूर राहिलेल्या गावांसह वाड्या-वस्त्यांवरही दुसर्‍या लाटेतील संसर्ग पोचल्याने सद्यस्थितीत संपूर्ण तालुकाच कोविड संक्रमित झाला आहे. मात्र, तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा वेग आता जिल्ह्यात सर्वोच्च 90.94 टक्क्यांवर पोचल्याने यातून थोडा दिलासाही मिळाला आहे.(Corona infection in 174 villages in Sangamner taluka)

कोविडचा तालुक्यात शिरकाव होवून एक एक गाव बाधित होत असताना, तालुक्यातील सात गावे आणि वाड्या-वस्त्या कोविड मुक्त होत्या. मात्र, दुसर्‍या संक्रमणाच्या लाटेत मात्र संपूर्ण तालुकाच बाधित केला आहे. तालुक्यातील शंभर टक्के गावांमध्ये कोविडचे संक्रमण पोचले आहे.

आजवर तालुक्यातील 174 गावे आणि वाड्या-वस्त्या मिळून 75 हजार 279 संशयितांच्या स्राव चाचण्यांतून 18 हजार 255 रुग्ण समोर आले आहेत. त्यातील 1 हजार 559 रुग्ण सक्रीय आहेत. तालुक्यात 46 खासगी डीसीएचसी रुग्णालयांशिवाय घुलेवाडीचे ग्रामीण रुग्णालय व संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज रुग्णालयातही कोविड बाधितांवरील उपचार सुरू आहेत.

सध्या ग्रामीण भागातील 1 हजार 242 तर शहरी भागातील 317 अशा एकूण 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यातील 59 रुग्ण कृत्रिमश्‍वसन यंत्रणेवर ( व्हेंटीलेटर ) तर 327 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. याशिवाय तालुक्यातील 631 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे तालुक्यात ऑक्सिजनची गरज असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 958 आहे. याशिवाय लक्षणे नसूनही पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचीही मोठी संख्या आहे.

तालुक्यातील 532 रुग्णांना विविध ठिकाणच्या कोविड केअर सेंटर्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच कोविड नियमांचे पालन करुन आपल्या कुटुंबाचे व उपचार करणार्‍या डॉक्टरांचे हमीपत्र दिलेले 34 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे उपचारांशिवाय केवळ विलगीकरणात असलेल्या तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्याही आता 601 झाली आहे. शासकीय नोंदीनुसार 1 मार्चपूर्वी म्हणजे कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेतील बारा महिन्यात तालुक्यातील 53 जणांचा बळी गेला. तर 1 मार्चनंतर आलेल्या संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत अवघ्या अडीच महिन्यांतच 42 जणांचा मृत्यू झाला.

संगमनेर तालुक्यात आजवर 16 हजार 601 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत शहरातील 22 जणांसह तालुक्यातील एकूण 95 जणांचा कोविडने बळीही घेतला आहे. (Corona infection in 174 villages in Sangamner taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT