Corona patient again in Rashin 
अहिल्यानगर

कोरोना लागला राशीनकरांच्या मागे, आणखी एक रूग्ण सापडल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

राशीन : मुंबई (वाशी) येथून राशीनला सुनेसोबत आलेल्या वृध्देचा कोरोनाने मृत्यू झाला असून संबंधित महिलेच्या सहा वर्षाच्या नातीला बाधा झाली होती. ती नगरच्या रूग्णालयात उपचार घेत आहे. या पहिल्या धक्‍यातून राशीनकर सावरत असतानाच आज पुन्हा कोरोनाचा पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने लॉकडाऊन शिथील करण्याच्या राशीनकरांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे.

येथील एका रूग्णाचा आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने राशीनकरांचे पुन्हा धाबे दणादले आहे. संबंधित व्यक्तीने लॉकडाऊनच्या काळात कामानिमित्त राशीन ते पुणे असा प्रवास केला होता. तेथूनच कोरोनाचा वानोळा पुन्हा राशीनकरांसाठी आणल्याची राशीनमध्ये चर्चा आहे.

आज पॉझिटिव्ह आलेला रूग्ण राशीनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (ता.25 व 26 मे रोजी ) गेला होता. मात्र त्याने पुण्याहून आल्याचे सांगितले नव्हते. त्यानंतर बुधवारी (ता.27) तो पुण्याहून आला असल्याचे डॉक्‍टरांना समजल्यावर या रूग्णामध्ये कोरोना संशयित लक्षणे जाणवल्याने त्यांनी स्वॅब घेण्यासाठी नगर येथील जिल्हा रूग्णालयात पाठविले होते. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने संबंधित व्यक्ती राहत असलेल्या भागात तातडीने धडक कृती दलाची तुकडी पाठवून संबंधित भाग सील केला आहे.

या रूग्णाच्या दोन मुली, एक मुलगा आणि वृध्द वडिलांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांनाही स्वॅब घेण्यासाठी आज सायंकाळी हलविण्यात आले. या रूग्णाच्या आरोग्य विभागातर्फे संबंधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यासाठी तातडीने शोध मोहीम राबविण्यात आली आहे. या रूग्णाने पुणे ते राशीन कोणत्या वाहनाने प्रवास केला आणि त्यानंतर तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याची चौकशी करून संबंधितांना तातडीने क्‍वारंटाईन करून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाच्या कुटूंबातील त्याच्या नातेवाईकांना तपासणीसाठी आरोग्य विभागाने तातडीने ताब्यात घेतले आहे. या रूग्णास पुण्याहून आल्यापासून घशाचा व खोकल्या त्रास होत होता. हा रूग्ण कोणा-कोणाच्या संपर्कात आला असेल याची माहिती प्रशासनाला घ्यावी लागेल व तातडीने उपाययोजना राबवाव्या लागतील. 

संबंधित रूग्णाच्या कुटूंबातील चौघे आणि यांच्या दोन भावांच्या कुटूंबातील दहाजण मिळून चौदा जणांना स्वॅब घेण्यासाठी नगर जिल्हा रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांची आरोग्य विभागाकहून शोध मोहिम सुरू आहे.

डॉ. दिलीप व्हरकटे, वैद्यकीय अधिकारी, राशीन.

पॉझिटिव्ह आलेल्य रूग्णाच्या संपर्कातील चार जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना स्वॅब घेण्यासाठी नगरला पाठविणार आहोत. तसेच तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील.

नानासाहेब आगळे, तहसीलदार,कर्जत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT