The corona patient from Rashin went home 
अहिल्यानगर

राशीनच्या चिमुरडीने वडिलांच्या मदतीने कोरोनाला हरवलं...आजीकडून झाली होती लागण

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाशी लढताना अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, कर्जत तालुक्यातील राशीनच्या चिमुरडीने कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे आत्मविश्वास असेल तर कोरोनावर मात करता येते, हे तिने दाखवून दिले आहे. ती आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती. कोरोनाशी लढून ती सुखरुप घरी परतली. 

आज येथील बूथ हॉस्पिटलमधून या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस इतर स्टाफही गहिवरला. कोरोना वॉर्डमधून बाहेर येताच त्यांनी या मुलीला  पुष्पगुच्छ देत तिचे स्वागत केले. पुढील चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत तिला निरोप दिला. खऱ्या अर्थाने 'कोरोना'ला पराभूत करता येते, हे या चिमुकलीने दाखवून दिले. वेळीच उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो, हा संदेशही यातून सर्वांपर्यंत पोहोचला.

वडीलही झाले होते क्वारंटाइन

काही दिवसांपूर्वी ही सहा वर्षीय मुलगी आजीसोबत कर्जत तालुक्यातील राशीन येथे आली होती. आजीला त्रास होऊ लागल्याने तपासले असता ती कोरोना बाधित असल्याचे आढळले. दरम्यान, यातच तिचा मृत्यू झाला. मात्र, त्या आजीबाईंच्या निकट सहवासितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या आजीबाईंच्या नातीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मुलीला एकटे वाटायला नको, यासाठी तिच्या वडिलांनीही क्वारंटाईन होत या हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यामुळे मुलीचा एकटेपणा गेला. डॉक्टरांच्या उपचारांनाही तिने अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आज ती बरे होऊन या हॉस्पिटलमधून बाहेर पडली.

अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोरोनाची बाधा झालेला रुग्ण बरा होऊ शकतो, हे दिसून आले आहे. त्यासाठी गरज आहे, ती वेळीच आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेण्याची. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, नव्हे, आपण या आजाराला पराभूत करु शकतो, हेच या चिमुरडीने दाखवून दिले आहे.

जिल्हा प्रशासन आणि सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे, संपर्क टाळण्याचे, सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. गाव आणि शहरातील दैनंदिन कामकाज सुरळीत होत असताना नागरिकांनी याबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

आजाराची लक्षणे असल्यास

आजाराची लक्षणे असतील तर आपल्याकडून तो संक्रमित होणार नाही याची काळजी अशा व्यक्तींनी घेऊन तात्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. इतरांनी या आजारामुळे आपण संक्रमित होणार नाही, यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क, समोरच्या व्यक्तीशी बोलताना पुरेशे अंतर ठेवून बोलणे, सॅनिटायझरचा वापर करणे, वारंवार हात धुणे या गोष्टी अवश्य करणे गरजेचे आहे. कारण, कोरोनाला पराभूत करु शकतो, हा विश्वास या सहा वर्षीय चिमुरडीने दिला आहे. परंतू, हा आजारच होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT