gar and NImgaon khalu centement zone
gar and NImgaon khalu centement zone 
अहमदनगर

दौंडवाल्यांमुळे श्रीगोंद्यातील दोन गावे सील

संजय आ. काटे

श्रीगोंदे : दौंड येथे आढळलेल्या अजून एका कोरोना रुग्णामुळे श्रीगोंद्यातील बफर झोनची दोन गावे प्रतिबंधीत क्षेत्र (कंन्टेंमेंट झोन) मध्ये आली आहेत. त्यामुळे निमगाव खलू व गार या दोन गावे सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करुन पुढची कार्यवाही करण्यासाठी पुणे व नगरच्या प्रशासनातील समन्वयाचा अभाव समोर आला.

दौंड येथील गांधी चौकातील एक व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्या परिसरापासून तीन किलोमीटर अंतरावरील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले गेले. यात श्रीगोंदे तालुक्यातील गार व निमगाव खलू ही दोन गावे आली आहेत. त्यामुळे या गावांची हद्द सील करुन गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सगळे व्यवहार पूर्णपणे बंद करतानाच गावातील लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यातच निमगाव खलू हे गाव नगर-दौंड महामार्गावर येत असल्याने प्रशासनाची अडचण वाढणार आहे.

यापूर्वी ही दोन गावे बफर झोनमध्ये होती, आता बफर झोनमध्ये कौठे गावाचाही समावेश झाला आहे. निमगाव खलू व गार ही दोन गावे प्रतीबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत झाली आहेत.
दरम्यान प्रतिबंधीत झोन लागू करण्याबाबत पुणे व नगर प्रशासनात समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. दौंड प्रांताधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत नगरला मेलवरुन प्रतिबंधीत गावांचे नावे कळविली. मात्र, त्यात तारखा चुकवून ठेवल्या. शिवाय श्रीगोंद्याच्या तहसीलदारांनीही ही बाब गांभीर्याने न घेता तो मेल दुर्लक्षीत केला. त्यामुळे या गावांमध्ये आज सकाळी प्रतिबंधीत झोनची कार्यवाही सुरु झाली आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आज सकाळी त्या गावातील हद्द सील करण्याचे व होम-टू होम जावून पुन्हा तपासणी हाती घेणार आहोत. बफर झोनमध्ये या तपासण्या पुर्ण झाल्या असल्या तरी आता प्रतिबंधात्मक झोननुसार पुढील कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT