Of corona patients Next to three thousand 
अहिल्यानगर

कोरोनाबाधितांची संख्या  गेली तीन हजारांच्या पुढे 

दौलत झावरे

नगर ः जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या फक्त सतरा आल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला होता; मात्र शनिवारी दिवसभरात तब्बल 280 कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याने कोरोनाबाधितांचा तीन हजारांचा आकडा पार केला आहे. 

जिल्हा रुग्णालयाकडून आज (शनिवारी) दुपारी सव्वाबारा वाजता अहवाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये 70 जण बाधित आढळून आले होते. सायंकाळच्या अहवालानुसार बाधितांमध्ये आणखी 210 रुग्णांची भर पडली. दिवसभरात जिल्ह्यात 280 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. 

सकाळच्या सत्रात जिल्हा रुग्णालयातील लॅबमधून आलेल्या अहवालात 70जण बाधित आढळले होते. त्यांमध्ये संगमनेरमधील बारा, पारनेरमधील पाच, नेवासे दोन, राहाता 11, राहुरी सात, कोपरगाव तीन, नगर ग्रामीण तीन, नगर शहर अकरा, पाथर्डी एक, शेवगाव एक, भिंगार दहा, कर्जत दोन, अकोले एक, तर नांदेड येथून आलेला एक, यांचा समावेश आहे.

सायंकाळच्या अहवालात आणखी 34 बाधित आढळले. त्यांमध्ये अकोले चार, पाथर्डी दोन, नेवासे एक, नगर ग्रामीण चार, मिलिटरी हॉस्पिटल दोन, कर्जत एक, श्रीरामपूर 11, कोपरगाव तीन, महापालिका हद्द तीन, श्रीगोंदे दोन आणि संगमनेरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. 

अँटिजेन चाचणीत आज 18जण बाधित आढळले. त्यांत राहाता दोन, पाथर्डी अकरा, कोपरगाव एक, कॅंटोन्मेंट एक, तसेच महापालिका हद्दीतील तीन रुग्णांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत एकूण 158 जण बाधित आढळून आले. त्यांमध्ये महापालिका हद्द 104, अकोले एक, कर्जत एक, नगर ग्रामीण 16, नेवासे पाच, पारनेर पाच, पाथर्डी दोन, राहाता 14, राहुरी तीन, संगमनेर तीन, श्रीगोंदे तीन व श्रीरामपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 3068 झाली असून, त्यापैकी 1480 जण बरे झाले आहेत. सध्या 1537 जणांवर उपचार सुरू असून, मृतांची संख्या 51 आहे.  दरम्यान, सकाळी जिल्ह्यातील 44 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT