Corona Superfast: 117 all day on Friday
Corona Superfast: 117 all day on Friday 
अहमदनगर

कोरोना सुपरफास्ट ः शुक्रवारी दिवसभरात ११७

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाने जिल्ह्यात रफ्तार पकडली आहे. तो वेगाने जिल्ह्यात फैलावत आहे. कोणतीही आडकाठी नसल्याने  लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोना त्यांना गाठत आहे. ते लोक इतरांना बाधित करीत आहेत.

 जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी २९ रुग्ण बाधित आढळून आले. या शिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता १४२१ इतकी झाली अाहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५९४ इतकी झाली आहे.

आज सायंकाळी जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये भिंगार १३, संगमनेर तालुका ०६ (मालदाड रोड ०१, रहेमत नगर ०१, गणेश नगर ०१, निमोण ०१, निंबाळे०१), नेवासा ०५ (पुनतगाव ०२, सोनई ०३), नगर शहर ०३, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णाचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ३१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. 
दरम्यान, आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.

अहमदनगर  जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. दिवसभरात तब्बल ११७ रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

भिंगार ०२, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा), अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण:६१६
बरे झालेले रुग्ण: ७९४
मृत्यू: ३३
एकूण रुग्ण संख्या:१४३९

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT