The corona test will be held in Pravara and it is also free 
अहिल्यानगर

प्रवरात होणार कोरोना चाचणी आणि तीही मोफत 

सकाळ वृत्तसेवा

लोणी (अहमदनगर) ः प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठातील कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. यामुळे आता कोरोना टेस्टसाठी पुण्याला नमुने पाठवायची गरज पडणार नाही.

या लॅबमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. राज्य सरकारची मान्यता असलेली जिल्ह्यातील ही पहिलीच कोरोना टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आज दिली.

विद्यापीठातील मायक्रो बायॉलॉजी विभागाला कोरोना चाचणीसाठी "नॅशनल ऍक्रिडेशन बोर्ड फॉर लॅबोरेटरी' यांचे प्रमाणपत्र व सरकारची परवानगी मिळाली.

झटपट येणार रिपोर्ट

याबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ""मायक्रो बायॉलॉजी विभागाने अत्यंत कमी कालावधीत कोरोना टेस्ट लॅबला प्रमाणपत्र मिळविले. त्यामुळे रुग्णांना अहवालासाठी दोन दिवस वाट पाहण्याची गरज नाही. फक्त दोन तासांत अहवाल उपलब्ध होतील.

ग्रामीण भागात अशी सेवा उपलब्ध केल्याचा आनंद असून, या लॅबमध्ये शासनाकडून आलेल्या कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी मोफत केली जाणार आहे.''

लॅबमध्ये दोन तासांत चार टेस्ट होतील, असे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, मायक्रो बायॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शरियार रोशनी यांनी सांगितले. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, डॉ. रवींद्र कारले उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT