Corona took the seventeenth victim at Sangamnera 
अहिल्यानगर

कोरोनाने संगमनेरात घेतला सतरावा बळी

आनंद गायकवाड

संगमनेर ः संगमनेरात कोरोनाचा कहर सुरुच अाहे. सोमवारी रात्री रॅपिड अँटीजेन प्रणालीद्वारा चोवीस जणांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील गजबजलेला रहिवाशी परिसर असलेल्या विद्यानगरमधील एका 48 वर्षीय व्यक्तीचा कोविडच्या संक्रमणातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात मृत्यु झाल्याचे वृत्त संगमनेरात धडकले. यामुळे संगमनेरातील कोरोना बळींची संख्या 17 झाली आहे.

या रुग्णाला मोठ्या प्रमाणात कोविड प्रादुर्भाव झाल्याने, प्रकृती अस्वस्थ्यानंतर त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयामार्फत नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

तेथे रविवारपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र कोविडच्या संक्रमणाला मोठा काळ उलटल्याने व वेळीच त्याने योग्य उपचार न घेतल्याने त्याच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यातच सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला.

हा तरुण वाहनांच्या दुरुस्तीचे काम करीत होता. आपल्या व्यवसायातून त्याने समाजातील सर्वस्तरात संपर्क निर्माण केला होता, अशा होतकरु युवकाचा कोविडने बळी गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या तरुणावर जिल्हा यंत्रणेमार्फत नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT