Corona trapped in the city ... The number of positive patients is five hundred 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाने आवळला फास...पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पावणे पाचशेवर 

सकाळ वृत्तसेवा

नगरः नगरमध्ये कोरोनाने चांगलाच फास आवळला आहे. आज आणखी दहा रुग्णांची भर पडली आहे. त्यात नगर शहर सात, अकोले दोन, संगमनेर एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली असून प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. खबदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी न केल्यास नगरमध्ये आणखी वेगाने कोरोनाचा फैलाव होण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 

शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्‍यक असताना नागरिक बेपर्वाईने वागत असल्याचे दिसत आहे. मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकण्याचे प्रकार सर्रास दिसत आहे, अशा महाभागांना सुमारे आतापर्यंत प्रशासनाने चौदा लाखांचा दंडही ठोठावला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवलानुसार नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील 30 वर्षांचा पुरुष, सुडकेमळा 50 वर्षांची महिला, पद्मानगर (पाइपलाइन) येथील 57 व 25 वर्षांची महिला, 60 वर्षांचा पुरुष, 11 वर्षाचा मुलगा आणि 30 वर्षाचा युवक बाधित आढळून आला आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हे सर्व रुग्ण आहेत. 
याशिवाय ब्राह्मणवाडा (अकोले) येथील 26 वर्षांचा युवक व 17 वर्षांची युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते. तसेच कुरण (संगमनेर) येथील 35 वर्षांचा युवकाला कोरोनाचा संसर्ग झाला असून हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे. जिल्ह्यात सध्या 150 जणांवर उपचार सुरू आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या 475 झाली आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 311 झाली आहे. आज आणखी 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 

90 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 
जिल्ह्यात 90 वर्षांच्या आजीबाईंसह चार रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. यात नगर तीन, श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 311 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT