Corona's patient in Suregaon, the premises will be sealed 
अहिल्यानगर

सुरेगावात कोरोनाचा रूग्ण, परिसर होणार सील

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : गेल्या काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त असलेल्या तालुक्यातील सुरेगाव येथील एका 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले. त्यामुळे सदर परिसर प्रशासनाच्या वतीने सील करण्याचे काम सुरू करण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विधाते यांनी दिली.

तालुक्यातील कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांची एकूण संख्या सहा झाली अाहे. त्यापैकी एकाचा मृत्यू, दोन जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी तालुक्यातील सुरेगाव येथील 45 वर्षीय सदर बाधित व्यक्ती ही गेल्या सहा महिन्यापासून पोटाच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मागील आठवड्यातील बुधवारी सदर व्यक्ती नाशिक येथे तपासणीसाठी गेले होते त्यानंतर त्यांना शिर्डी येथील साई संस्थान रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. तेथेच त्यांच्या घशाचा स्त्राव घेण्यात आला असता तो पॉझिटिव्ह आल्या असल्याचे निष्पन्न झाले. 

या रुग्णाच्या निमित्ताने आता कोपरगावच्या ग्रामीण भागातदेखील संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पुढे आले अाहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT