Corona's series won't stop five more positives in Nagar 
अहिल्यानगर

कोरोनाचा सिलसिला थांबेना... नगरमध्ये आणखी पाच पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात बुधवारी (ता.3) सकाळी आलेल्या अहवालात आणखी पाच जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 177 वर गेली आहे. दरम्यान, आज 48 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 

नव्याने बाधित आढळून आलेले रुग्ण हे आधीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीमध्ये एक तरुण कोरोनाबाधित सापडला होता. आता त्याच्या घरातील 65 व 41 वर्षे वयाच्या दोन महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या. माळीवाड्यातील 32 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे. तसेच संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील 26 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली. भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेली 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. 

आतापर्यंत 78 जण कोरोनामुक्त

दरम्यान, जिल्ह्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या 177 वर जावून पोचली आहे. आतापर्यंत 78 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या 

  • नगर शहर- 33 
  • नगर तालुका- 3 
  • संगमनेर- 38 
  • राहाता- 11 
  • जामखेड- 15 
  • नेवासे- 3 
  • कोपरगाव- 1 
  • पाथर्डी- 1 
  • अकोले- 8 
  • श्रीगोंदे- 2 
  • श्रीरामपूर- 2 
  • कर्जत- 5

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT