Corruption in Ahmednagar Zilla Parishad 
अहिल्यानगर

झेडपीत सुरू होते "तोडपाणी', "चहापाणी"... पाहुणे येताच...

दौलत झावरे

नगर ः जुन्या काळी झेडपी नावाचा एक मराठी सिनेमा आला होता. तत्कालीन भ्रष्ट परिस्थितीवर त्यात भाष्य केलं होतं. परंतु आजच्या काळातही त्यात फारसा फरक पडलेला नाही. नगर जिल्हा परिषदेचे काही विभाग तोडपाण्यासाठी परचित आहेत. सर्वसाधारण सभेतच काही सदस्यांनी त्याची जाहीर वाच्यता केली होती. 

काल तर अजब प्रकार घडला. त्या तोडपाण्याचीच चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दिवसभर सुरू होती. तोडपाण्याचा बेत ठरला. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता गृहात शक्‍यतो, हे असले तोडपाण्याचे कार्यक्रम होतात. हे उघड गुपित आहे. 

चहापाणी कोठे घ्यायचे, हेही ठरले होते. त्यासाठीची वेळही मुकर्रर झाली होती. परंतु या चहापाण्याच्या कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी सरकारी पाहुणे येणार असल्याची कुणकुण संबंधिताला लागली. त्यामुळे उगाच वेगळ्याच लफड्यात नको अडकायला म्हणून त्याने इरादा बदलला.

पाहुणे आले नि संबंधितांचे धाबेच दणाणले. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहायला लागल्या. 
मनातील भीती चेहऱ्यावर न दाखविता त्यांनी आपले दैनंदिन कामकाज सुरूच ठेवले. पण हे पाहुणे नेमके कोणाकडे आले कोणाला स्पष्ट माहिती नसल्याने या विभागातून त्या विभागातील मित्रांकडून घेण्याचा प्रयत्न काहींनी केला. 
लक्ष्मीदर्शनानंतरच कामे होत असल्याने सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संबंधितांच्या कानउघडणीनंतरही चहापाणी, तोडपाणी सुरू आहे. अशाच एका प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा परिषदेत पाहुणे आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरु होती. मात्र, पाहुणे कोणत्या विभागामध्ये आले होते, हे स्पष्ट झाले नाही. पाहुणे आले व गेले गेल्याच्या चर्चेपासून मात्र अधिकारी अनभिज्ञ होते. त्यामुळे पाहुणे न येताच कोणी तरी अफवा पसरविल्याची शक्‍यता आता कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. जे तोडपाणी, चहापाणी करतात, त्यांची सध्या बोलतीच बंद झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT