river esakal
अहिल्यानगर

भागीरथी नदीत आढळलेल्या मायलेकांच्या मृतदेह प्रकरणी लागला छडा

सकाळ डिजिटल टीम

शेवगाव (जि.अहमदनगर) : सोमवारी सकाळी (ता.९) मायलेकरांचे मृतदेह नदीत आढळून होता. दरम्यान, या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अखेर या प्रकरणाचा छडा आता लागला असून या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.

भागीरथी नदीत आढळले होते मायलेकांचे मृतदेह

ठाकूर पिंपळगाव येथील शेवगाव-गेवराई रस्त्यावरील भागीरथी नदीच्या पुलाखालील सिमेंटच्या पाइपमध्ये ज्योती अंबादास सोनवणे व दीपक अंबादास सोनवणे या मायलेकरांचे मृतदेह सोमवारी (ता. ९) सापडले होते. मृत महिलेच्या मुलीने दिलेल्या माहितीवरून मृत ज्योती सोनवणे व दीपक सोनवणे हे सुवर्णा अशोक घोरपडे या महिलेसह रविवारी (ता. ८) दुपारी घरामधून बाहेर गेले होते. सायंकाळी अंबादास सोनवणे एकटेच घरी आले. मायलेकरांचा शोध घेऊनही ते सापडल्याने अंबादास सोनवणे याने पत्नी व मुलगा हरवल्याची खबर बोधेगाव पोलिस चौकीत दिली. तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे दोन दिवसांपूर्वी नदीत मृतावस्थेत सापडलेल्या माय-लेकरांच्या मृत्यूप्रकरणी मृत महिलेच्या पतीस बिडकीन (ता. पैठण) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. मृत महिलेची आई चंद्रकला नवनाथ जगदाळे (रा. सुकळी खुर्द, ता. नेवासे) यांच्या फिर्यादीवरून अंबादास अशोक सोनवणे (वय ४०) व सुवर्णा अशोक घोरपडे (वय ३५, दोघेही रा. ठाकूर पिंपळगाव, ता. शेवगाव) यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीच निघाला खूनी

दरम्यान, सोमवारी सकाळी मायलेकरांचे मृतदेह नदीत आढळून आले. दरम्यान, अंबादास सोनवणे रविवारपासून गायब झाल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मृत महिलेची आई चंद्रकला जगदाळे यांच्या फिर्यादीनुसार अंबादास सोनवणे व सुवर्णा घोरपडे या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सोनवणे यास पोलिसांनी बिडकीन येथून ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro 5 : कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावणार, १८ हजार कोटींच्या निधीला मंजूरी; कसा असेल मार्ग?

फोनवर बोलेना, इग्नोर करतो! तरुणीनं तरुणाचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल, फेक अकाउंटवरून पाठवले नातेवाईकांना

ठाकरेंची भेट, धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त विधान ते आमदार गायकवाड; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Dalit Groom Assault : घोड्यावर बसल्यामुळे दिव्यांग दलित नवरदेवाला खाली ओढत बेदम मारहाण; वरातीत घुसून तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

Konkan Railway : उन्हाळी हंगामातील प्रवाशांसाठी ‘कोकण रेल्वे’ने काढला नवा उपाय, चिपळूण-दिवा विशेष मेमू धावणार; असे असेल वेळापत्रक

SCROLL FOR NEXT