Danger of fun ... 
अहिल्यानगर

"सोशल'वरील गमती-जमतीचा धोका...

दौलत झावरे

नगर : रोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिक घरात असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला वेळ घालवीत आहेत. त्यात महिलांमध्ये व्हॉट्‌सऍपवर चॅलेंज ऍक्‍सेप्टेड हा खेळ सुरू झाला असून, एकमेकांनी चॅलेंज देऊन छायाचित्र ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हा गमती-जमतीचा खेळ सुरवातीला व्हॉट्‌सऍपवर सुरू होता. आता फेसबुक, इन्स्टाग्राम आदी माध्यमावरून सुरू झाल्याने छायाचित्रांचा गैरवापर होण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खेळाला आता ब्रेक लावण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे लॉकडाउन करण्यात आले आहे. 

या लॉकडाउन काळात सोशल मीडियावर महिलांमध्ये एकमेकांना चॅलेंज देऊन सोशल मीडियावर स्वतःचे छायाचित्र ठेवण्याचे आवाहन दिले जात आहे. यामध्ये झुकी झुकी नजर, नववारी साडी, गॉगल नखरा, नथीचा नखरा, हातभर बांगड्या आदी प्रकारचे चॅलेंज महिला एकमेकींना देऊन फोटो व्हॉट्‌सऍपला स्टेटस ठेवण्याचे आवाहन देत आहेत. सुरवातीला व्हॉट्‌सऍपवरील खेळ फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर सुरू झालेला आहे. या सोशलवरील छायाचित्र कोणीही लोड करून त्याचा दुरूपयोग करण्याची भीती आता महिलांमधून व्यक्त केली जात आहे. 


या अगोदर महिलांच्या सोशलवरील छायाचित्रांचा आधार घेऊन लुटण्याचे अनेक उद्योग झाले आहेत. तसेच काहीसे प्रकार आता पुन्हा सुरू झाले आहेत. या खेळात सहभागी होऊन छायाचित्र सोशलवर अपलोड करण्याच्या प्रकारामुळे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट येऊ लागल्याने अनेक महिलांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे काही महिलांनी आता स्वतः पुढाकार घेऊन हा खेळ थांबविण्याचे आवाहन करण्यास सुरवात केली आहे.

सोशलवर फोटो स्टेटस, डीपी अपलोड करण्यापेक्षा मैत्रिणींनी व्यक्तिगत पाठवून आवाहन द्यावे, असे प्रबोधन काही महिलांकडून केले जात आहे. 

महिलांनी काळजी घ्यावी ः राजपूत

सोशलवरील चॅलेंज ऍक्‍सेप्टेड खेळ हा करमणुकीचा असला, तरी तो खेळताना महिलांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सोशलवरील फोटोंचा गैरवापर होण्याची शक्‍यता आहे. आपल्या एका चुकीने संपूर्ण कुटुंबाला त्याचा मनःस्ताप सहन करण्याची वेळ येऊ नये, म्हणून महिलांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करणे टाळावे. 
- छाया राजपूत, प्रांताध्यक्ष, लायनेस क्‍लब, अहमदनगर 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT