Dattawadi Zilla Parishad is also open during school holidays 
अहिल्यानगर

दत्तवाडी जिल्हा परिषद शाळेचा इमानदार शिक्षक, सुट्टीतही भरवतो वर्ग

वसंत सानप

जामखेड : देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्राथमिक शाळा बंद आहेत. मात्र, तालुक्‍यातील दत्तवाडी (धोंडपारगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटीच्या दिवशीही भरते. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण दिले जात असल्याने, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढून उपस्थितीही वाढली आहे. या कामाची दखल घेत शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी येथील शिक्षक मनोहर इनामदार यांचा गौरव केला. 

शाळा हेच मंदिर समजून मागील अनेक वर्षांपासून इनामदार दत्तवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यादानाचे काम करीत आहेत. शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांत 46 विद्यार्थी आहेत. द्विशिक्षकी शाळेत इनामदार यांचे शैक्षणिक कार्य रविवारीदेखील अविरतपणे सुरू असते. 

सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र दत्तवाडीची शाळा रविवारीदेखील सुरू असते. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी स्वतःच्या शाळेसह तालुक्‍यातील अन्य 14 शाळांच्या विद्यार्थ्यांना दत्तवाडी शाळेत सुटीच्या दिवशी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी परीक्षेत चमकले. शिक्षणाबरोबरच संस्कार, संस्कृतिसंवर्धन, व्यायाम व स्वच्छतेचे धडेही ते विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढला आहे. 

कीर्तन- प्रवचनांतूनही समाजप्रबोधन 
शिक्षणाबरोबरच संतसाहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. प्रवचन व कीर्तनांतूनही ते समाजप्रबोधन करीत आहेत. लोकसहभागातून त्यांनी शाळेत भौतिक सुविधादेखील उपलब्ध केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT