The death toll in Ahmednagar is 1124 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा झाला ११२४

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात 178 बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 638 झाली आहे. दोन रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने, मृतांची संख्या 1124 झाली. 

जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख एक हजार 63 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यांपैकी 18.61 टक्के जण बाधित आढळून आले. बाधितांपैकी मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण 1.51 टक्के आहे. कालच्या बाधितांमध्ये नगरमध्ये सर्वाधिक 53 रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल पारनेर 29, राहाता 19, संगमनेर 15, नगर तालुका 13, श्रीगोंदे 9, श्रीरामपूर 8, कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी 6, जामखेड 5, कर्जत व राहुरी प्रत्येकी 3, शेवगाव 2, नेवासे 2, तसेच अकोले येथील एका रुग्णाचा समावेश आहे. परजिल्ह्यांतील 4 रुग्ण आहेत. 

दिवसभरात 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 72 हजार 632 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 97.31 टक्के झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Arrival Maharashtra : मॉन्सून आगमनाची तारीख बदलली, ८ ते १० जूनदरम्यान महाराष्ट्रात पाऊस; शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणार

Mumbai Goa Highway: ‘आधी सुरक्षित महामार्ग द्या, मगच टोल घ्या!’; कोकणवासीयांचा खारपाडा टोलनाक्यावर एल्गार, मुंबई-गोवा महामार्गावरील कामांवर संताप..

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू; अभिनेत्याने शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT