Debt waiver scam in Pathardi  
अहिल्यानगर

पाथर्डीत कर्जमाफीत झाला घोटाळा...मनसेच्या शॅडो कॅबिनेट सदस्याने उजेडात आणले प्रकरण

राजेंद्र सावंत

पाथर्डी ः महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत मढी व शिरापूर सेवा सहकारी संस्थेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा पक्षाच्या शॅडो कॅबिनेटचे सदस्य संजू पाखरे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

पाखरे यांनी मढी व शिरापूर सेवा संस्थेत कर्जमुक्ती योजनेच्या यादीत बनावट लाभार्थी दाखवून गैरव्यवहार केल्याची तक्रार ई-मेल द्वारे केली. त्यात म्हटले आहे, की शिरापूर आणि मढी सोसायटीमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार आजी-माजी पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांनी संगनमताने केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा यात सहभागी असण्याची शक्‍यता आहे. कृषिमंत्री भुसे यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे पाखरे यांनी सांगितले. 
 

मढी व शिरापूर येथील तीन शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्ती योजनेत नजरचुकीने आली होती. त्या शेतकऱ्यांच्या नावाने आलेले सुमारे दीड लाख रुपये बॅंकेमार्फत पुन्हा सरकारकडे पाठविले आहेत. 
- शरद खुडे, सचिव, सेवा सहकारी संस्था, मढी व शिरापूर 
 

-संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT