Delivery of Corona Patient in Ahmednagar 
अहिल्यानगर

कोरोनाबाधित महिलेेला झालंय जुळं, अशी बाळांची तब्येत

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या आठवड्यापासून वाढायला सुरूवात झाली आहे. नगर शहर कोरोनामुक्त झाले असताना पुन्हा त्यात भर पडली आहे. शेवगाव वगळता संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाने वेढा दिला आहे. त्यामुळे पुन्हा ग्रीन झोनकडून जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करतो की काय अशी भीती वाटू लागली आहे.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक महिला कोरोना बाधित आहे. ती गर्भवती होती, या महिलेचे सिझरियन करण्यात आले. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे. मुंबईहून निंबळक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिचे सिझेरियन केले. या बाळांची तब्येत चांगली आहे. राज्यात आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी कोरोनाबाधित महिलांनी बाळांना जन्म दिला. बहुतांशी बाळांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहेत. नगरच्या जिल्हा रूग्णालयात जन्माला आलेल्या या जुळ्यांचा रिपोर्ट आतापर्यंत घेण्यात आलेला नाही. पाच दिवसांनंतर त्यांची तपासणी केली जाणार आहे. तो निगेटिव्ह येईल अशी डॉक्टरांना आशा आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT