Demand for CBI investigation into Sahebrao Gaikwads death 
अहिल्यानगर

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मृत्यूमागे आर्थिक हितसंबंधच कारणीभूत, मोठ्या नेत्याचा आरोप

रवींद्र काकडे

लोणी : पुण्याचे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. गायकवाड यांच्या मृत्यूमागे महसूल विभागातील बदल्यांमधील आर्थिक हितसंबंधच कारणीभूत असल्याचा थेट आरोप विखे पाटील यांनी केला आहे. 

अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने गुरुवारी (ता. 7) निधन झाले. एक उमदा व कार्यक्षम अधिकारी गमावल्याचे अनेक अधिकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली होती.

चारच दिवसांत पुन्हा बदली

गायकवाड यांच्या मृत्यूची वेगळीच कारणं आता समोर येत असल्याचे सांगून विखे पाटील म्हणाले, ""साताऱ्यातून आठ महिन्यांपूर्वीच गायकवाड यांची पुण्यात बदली झाली होती. मात्र, चारच दिवसांत त्यांची पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अचानक बदली करण्यात आली. असे कोणते कारण घडले, की चारच दिवसांत त्यांची पुन्हा बदली करण्यात आली.'' 

मोठे आर्थिक हितसंबध गुंतल्याची चर्चा

विखे पाटील म्हणाले, ""प्रशासनापुढे सध्या कोरोना संकटाचे मोठे आव्हान आहे. अशा वेळी गायकवाड यांची बदली होणे हे संशयास्पद ठरते. सध्या राज्य सरकारने प्रशासनातील सर्व बदल्यांना स्थगिती दिली असतानाही महसूल विभागातील विशिष्ट पदावर कार्यरत असलेल्या गायकवाड यांची बदली कशी झाली, याची चौकशी करावी. या प्रकरणात मोठे आर्थिक हितसंबध गुंतले असल्याची चर्चा महसूल विभागातूनच पुढे आली आहे.'' 

बदलीला "मॅट'मध्ये स्थगितीही

गायकवाड यांनीच या बदलीला "मॅट'मध्ये आव्हान देऊन स्थगितीही मिळवली होती. बदलीच्या घोळामुळे अनेक दिवसांपासून ते तणावात होते. त्यामुळेच त्यांच्यावर कोणी दबाव आणला का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT