Demand for digitization of documents in town planning department
Demand for digitization of documents in town planning department 
अहमदनगर

नगररचना विभागातील दस्तावेज डिजीटल करण्याची मागणी 

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : नगरपालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगी विषयक प्रकरणे, बिगरशेती प्रकरणे, नकाशे आणि तत्सम दस्तावेज व्यवस्थित स्कॅनिंग करुन ठेवण्याची मागणी नगरेसविका हेमा गुलाटी यांनी पालिकेकडे केली. 

या संदर्भात गुलाटी यांनी नगराध्यक्ष अनुराधा अदिक आणि प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना वरील मागणीचे निवेदन दिले. नगरपालिकेच्या बांधकाम विभागांतर्गत नगररचना विभाग हा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा विभाग असून सदर विभागामध्ये नगररचना विभागाकडील विविध योजनांचे नकाशे, विकास योजनांचे नकाशे, बांधकाम परवानगी विषयक परवानगी प्रकरणे, बिगरशेती प्रकरणे, विनापरवाना बांधकामे आणि तत्सम स्वरुपाचे दस्तावेज अनेक वर्षापासून उपलब्ध आहे. 

त्यामुळे सदरचे दस्तावेज हे अद्यावत स्वरुपात ठेवणे आवश्‍यक आहे. परंतु, सध्या बांधकाम विभागाकडील बांधकाम परवानगी प्रकरणे, बिगरशेती विषयक प्रकरणे आणि त्या अनुषंगीक दस्तावेज हे पुरेशा जागे अभावी व्यवस्थितपणे ठेवलेले नाही. जुनी बांधकाम परवानगी प्रकरणासह नकाशे जीर्ण झाले असून त्याचे तुकडे पडत आहेत.

हा दस्तावेज विस्कळीत झाल्याने नागरिकांना सदरचे दस्तावेज शोधण्यासाठी आवश्‍यक माहितीसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे बांधकाम विभागाकडील मालमत्ता विषयक दस्तावेज हे महत्वाचे दस्तावेज असून ते स्कॅनिंग करुन डिजीटल फाईलमध्ये कायमस्वरुपासाठी जतन करावे. त्यासाठी स्कॅनर, प्रिंटर उपलब्ध करुन देण्याची मागणी गुलाटी यांनी निवेदनाद्वारे केली.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT