The demand for an inquiry into the death of Dr.Thorat family is being made in Rashin 
अहिल्यानगर

'डॉक्टर थोरातांची आत्महत्या, चिठ्ठीतलं कारण न पटणारं; मृत्यूची चौकशी व्हावी'

सकाळ वृत्तसेवा

राशीन (अहमदनगर) : येथील डॉ. महेंद्र थोरात व त्यांच्या कुटुंबाच्या मृत्यूचा पोलिसांनी कसून तपास करावा. डॉ. थोरात यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलाच्या आजारपणाचे कारण नमूद केले असले, तरी ते न पटणारे आहे. त्यांना आत्महत्या करण्यास कोणी भाग पाडले का, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डॉ. थोरात यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चौघांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. डॉक्‍टरी क्षेत्रात अमाप यश मिळविणारे, राशीनमध्ये मोठे हॉस्पिटल उभारून रुग्णसेवा करणारे डॉ. थोरात सतत हसतमुख होते. आत्महत्या करण्याचे कोणतेच कारण त्यांच्याकडे नव्हते. थोरल्या मुलास थोडे कमी ऐकू येत असले, तरी तो प्रचंड हुशार होता. 

पुण्यातील क्रिकेट अकॅडमीत शिकत होता. मुलास कमी ऐकू येण्याचे कसलेच शल्य डॉक्‍टरांना नव्हते. उलट, भविष्यात त्याला काय करायचे, याचा 'रोड मॅप' त्यांच्याकडे होता. मात्र, चिठ्ठीत हेच कारण पुढे केल्याने ते कोणालाच रुचत नाही. त्यामुळे थोरात कुटुंबाच्या मृत्यूचे खरे कारण शोधावे, अशी मागणी राशीन डॉक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कानगुडे, सचिव डॉ. युवराज शिंदे, डॉ. विनायक जगताप, डॉ. मंगेश रेणुके, डॉ. शिवाजी काळे, डॉ. पंकज जाधव आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प नरमले पण इराण युद्ध थांबवणार नाही, सांगितले 'हे' मोठे कारण

Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना बंद! 2 वर्षे झाले अर्ज करून सोलापुरातील 600 ज्येष्ठ नागरिकांना मिळेना ‘तीर्थदर्शन’; शेवटची इच्छा अपूर्णच, वाचा...

मोठी बातमी! आता प्रत्येक शिक्षकाचे स्वतंत्र प्रोफाईल तयार होणार; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; एका क्लिकवर मिळणार ३ लाख शिक्षकांचा बायोडाटा

Panchang 24 March 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण आणि ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT