Demands of sugarcane workers to the government 
अहिल्यानगर

६० वर्षावरील नागरिक ऊसतोडणीसाठी न आल्यास लहान मुलांचे पालनपोषण कोण करणार

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तोंडावर आलेल्या ऊसतोडणी हंगामासाठी जाण्याबाबत ऊसतोड कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतांना वेगवेगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी सरकार व कारखानदार यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामुळे शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगारांचे डोळे सरकार आणि संघटनांच्या निर्णयाकडे लागले आहेत. 

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पुर्व भागातील 80 हजार ते एक लाख ऊसतोड कामगार राज्यात विविध कारखान्यांना दरवर्षी तोडणीसाठी जातात. जिल्हयासह सातरा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे तालुके म्हणून या दोन तालुक्यांकडे पाहीले जाते. यंदा समाधानकारक पावसामुळे ऊसाचे प्रमाण खुप वाढले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे हंगाम दीर्घ काळ चालणार आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटूंबियांना विविध आरोग्य सुविधा पुरवाव्यात यासाठी ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी सरकार व साखर कारखानदार यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

मजूरी वाढ करण्याबरोबरच मोफत आरोग्य सेवा, कारखान्यावर कोवीड सेंटर तयार करणे, पद्मश्री डाँ. विठ्ठलराव विखे ऊसतोड कामगार सुरक्षा विमा योजनेची अमलबाजवणी करुन त्याची विमा रक्कम पाच लाख करण्यात यावी. कामगारांच्या मुलांसाठी निमासी आश्रम शाळा सुरु कराव्यात, नगर जिल्हयात राबवण्यात आलेला ऊसतोड कामगार उनत्ती प्रकल्प राज्यभर राबवण्यात यावा, कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, मजूरांच्या अडयावर स्वच्छ पामी व लाईटची व्यवस्था करण्यात यावी. मुकाद्दम व कामगार यांना शासकीय ओळखपत्र देण्यात यावे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. व मागील हंगामाचे ऊसतोडणी फरक बील त्वरीत मिळावे यामागण्या महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकाद्दम कामगार युनियन यांच्या मार्फत सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. या संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी या मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड कामगार व वाहतुक मुकाद्दम बेमुदत संपावर जातील. 

मागील वर्षीचा हंगाम मार्च एप्रिल पर्यंत लांबल्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने लागू केलेल्या लाँकडाऊनमुळे तालुक्यातील अनेक कामगार पश्चिम महाराष्ट्रातील कारखाना कार्यस्थळावर अडकुन पडले होते. त्यामध्ये कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियांची मोठी हेळसांड झाली होती. त्यामुळे अनेक कामगारांनी यावर्षी कारखान्याची उचल घेतलेली नाही. त्यातच कोरोनाचा संर्ग दिवसेंदिवस ग्रामिण भागातही वाढत असल्याने याबाबत काय उपाय योजना करणार असे कारखान्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या हंगामातील ऊसतोडणीसाठी कारखान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

ऊसतोड कामगार कुटूंबातील 60 वर्षावरील वृध्द व लहान मुलांना ऊसतोडणीसाठी आणू नये अशी अट सरकारने घातली आहे. त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी या काळात कोण घेणार असा प्रश्न आहे. या शिवाय विविध बारा मागण्यांसाठी सराकर व साखर कारखानदार यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. त्या मान्य न झाल्यास संघटनेकडून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकाद्दम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT