Ajit Pawar Esakal
अहिल्यानगर

Ajit Pawar: 'आम्ही सत्तेला हापापलेलो नाहीये तर...', लंकेंच्या मतदारसंघात अजित पवार असं का म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पारनेर दौऱ्यावर आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पारनेर दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे'चा शुभारंभ होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी बोलताना अजित पवारांनी आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलं. तसेच, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं आहेत. कोरोना काळात केलेल्या लंकेंच्या कामाचा उल्लेखही पवारांनी यावेळी केला आहे. त्यासोबतच लंकेंच्या मतदारसंघात विविध विकासकामं करण्याचं आश्वासन अजित पवारांना यावेळी दिलं आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, “पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांवर संकट उद्भवलं आहे. यंदा उजनी धरण फक्त 60 टक्के भरलंय. काही भागांमध्ये धरणं भरली आहेत, तर काही भागांमध्ये परिस्थिती बिकट आहे.”

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकांचे, जनतेचे प्रश्न सुटावेत हीच आमची इच्छा आहे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अडचणी दुर झाल्या पाहिजेत. काहीजण मला भेटतात निवेदन देतात, दादा हे प्रश्न मार्गी लावा, आणि आम्ही लोकं पदावर बसतो, ते काय आम्ही सत्तेला हापापलेलो नाहीये. ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला येत नाही. मिळालेले पद आणि मिळालेली सत्ता आहे तोपर्यंत सामान्याचे प्रश्न सोडवू असं अजित पवार म्हणालेत.

“आई मोहटा देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो. अहमदनगर जिल्हा हा तसा पसरलेला जिल्हा आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून याची ओळख आहे. पाणी आपला आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मातेच्या आशीर्वादाने संकट दूर झालं पाहिजे यासाठी आपण साकडं घालुया,” असं साकडं अजित पवारांनी देवीला घातलं आहे.

निलेश लंके आधुनिक श्रावणबाळ

यावेळी बोलताना अजित पवार यांनी निलेश लंकेंच्या कामाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “जागृत लोकप्रतिनिधी कसा असावा हे निलेश लंके यांच्या उदाहरणातून स्पष्ट होतं. कोरोना काळात निलेश लंकेंनी कौतुकास्पद काम केलं. आमच्यावर अनेक वेळा घराणेशाहीची टीका होते. तुमच्या घरात कुणीतरी राजकारणात आहे म्हणून तुम्हाला संधी मिळते, असं म्हटलं जातं."

"मात्र, निलेश लंकेंच्या माध्यमातून त्या लोकांना उत्तर आहे. स्वर्गीय आर. आर. पाटील यांचा आधुनिक गाडगेबाबा म्हणून उल्लेख व्हायचा. तसंच निलेश लंके यांना आधुनिक श्रावणबाळ म्हटलं जातंय. एक दमदार आमदार म्हणून लंके यांची ओळख आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT