Deputy Tehsildar of Sangamner infected with corona 
अहिल्यानगर

पुण्यात कुटुंबाला भेटायला गेलेले नायब तहसीलदार बाधित

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याला गेलेले संगमनेर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार कोरोनाच्या तडाख्यात सापडले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्याला लागण होण्याच्या पहिल्याच घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

संगमनेरच्या तहसील कार्यालयात सध्याच्या कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे एक नायब तहसीलदार गेल्या रविवारी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. मात्र, तेथे त्यांना कोरोनाची लागण झाली. भेटीनंतर ते संगमनेरात परतले होते. रविवारी ( ता. 7) श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून पुण्याला हलविण्यात आले. तेथे त्यांचा स्राव घेऊन तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

संगमनेरातील कोरोना लढ्यात त्यांच्यावर परजिल्ह्यात जाण्यासाठी परवाना देण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे दररोज त्यांचा अनेक लोकांशी, तसेच कार्यालयातील सर्वांशीच संपर्क होता. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते कार्यालयात नसल्याने, बाधा झाल्यानंतर ते नेमके कोणाच्या संपर्कात आले याचा शोध घेतला जात असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT