milk sale esakal
अहिल्यानगर

दूध खरेदी करताना सावधान! उत्पादकांसह ग्राहकांचीही लूट

मार्तंड बुचुडे

पारनेर (जि.अहमदनगर) : कोरोना व लॉकडाउनमुळे (corona and lockdown) शेतीमालाला बाजारभाव नाही. भाजीपालाही (vegetables) फारसा विकला जात नाही. अशा स्थितीत दुधाचेही (milk sale) दर कमी असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सध्या उत्पादकांना तोटा, तर ग्राहकांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत.

दूध खरेदी-विक्रीच्या दरात तफावत

दूधखरेदीचा दर २२ ते २४ रुपये आहे. मात्र, विक्रीचा दर ४० ते ४८ रुपये, तर शहरात तो ५५ ते ६० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे उत्पादकांना तोटा, तर ग्राहकांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. गायी- म्हशींसह पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सरकार मात्र दूध दरवाढ करण्याबाबत उदासीन असल्याने, हा व्यवसाय मोडकळीस येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कोरोना व लॉकडाउनमुळे शेतीमालाला बाजारभाव नाही. भाजीपालाही फारसा विकला जात नाही. अशा स्थितीत दुधाचेही दर कमी असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पशुखाद्याचे दर मागील वर्षभरात सुमारे ३५ ते ४५ टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, दुधाचे दर कमी होत आहेत. दूधउत्पादनाचा खर्च सुमारे ३५ रुपये प्रतिलिटर येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिलिटर १० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी शेतकऱ्यांना किमान ३२ ते ३५ रुपये दर मिळणे गरजेचे आहे. सरकारने दुधास हमी भाव जाहीर केला नाही, तर भविष्यात हा व्यवसाय टिकणार नाही.

शेतकरी आर्थिक अडचणीत

दूधउत्पादकांची अनेक दिवसांपासूनची हमी भावाची मागणी आहे. त्यासाठी दूधउत्पादकांनी आंदोलनेही केली. मात्र, सरकारने त्याची दखल घेतली नाही. अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूधव्यवसाय सुरू केला आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह त्यावरच अवलंबून आहे. मात्र, दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

पशुखाद्याचा वाढता बाजारभाव व दुधाचा कमी दर, यातील तफावत भरून काढणे गरजेचे आहे. सरकारने दूधउत्पादकांचा विचार करून हमी भाव जाहीर करणे गरजेचे आहे. आम्ही सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. - वसंत सालके, संचालक, पारनेर तालुका दूध संघ

भेसळीमुळे आजारांची भीती

सध्या दुधाऐवजी टोन्ड व भेसळयुक्त दुधाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे आजारी पडण्याच्या भीतीने अनेकांनी दूध व दुधाचे पदार्थ खाणे सोडून दिले आहे. त्यातूनच दुधाशिवाय चहाची संकल्पना पुढे आली आहे. त्यामुळे दुधाची मागणी कमी झाली आहे.

पशुखाद्याचे दर (प्रति ५० किलो)

शेंगदाणा पेंड- २५०० ते २७०० रुपये

सरकी पेंड- १८०० ते २००० रुपये

भुसा- ८५८ ते ११०० रुपये

ऊस सुमारे- तीन हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT