Remdesivir injection Esakal
अहिल्यानगर

रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरणातील फरारी आरोपी कोविड सेंटरचा संचालक

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) ः वडाळा बहिरोबा (ता.नेवासे) येथील रेमडेसिव्हीर काळाबाजार करणारे रॅकेट पोलिसांनी जेरबंद केले असले तरी या प्रकरणातील फरार आरोपी एका कोविड सेंटरचा संचालक असल्याचे उघड झाल्याने पोलिसांच्या भुमिकेबद्दल ग्रामस्थांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. (Director of the Covid Center, which illegally sells remedivir)

नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने रविवार (ता.९) रोजी वडाळा बहिरोबा येथील एका हाॅटेलसमोर छापा टाकून रेमडेसिव्हीरचा काळाबाजार प्रकरणी रामहरी घोडेचोर (देवसडे ता.नेवासे), सागर हंडे (खरवंडी ता.नेवासे), आनंद थोटे (भातकुडगाव ता.शेवगाव), पंकज खरड (देवटाकळी ता.शेवगाव) या चार आरोपीस सहा रेमडेसिव्हीर इंजेक्शनसह अटक केली होती. एक इंजेक्शन पस्तीस हजार रुपायास विक्री करताना सर्व आरोपी आढळून आले आहेत.

गुन्हे अन्वेषणने या कारवाईत एक चारचाकी वाहन एम.एच.१२ एन.पी.७९११ व दोन मोटारसायकली एम.एच.१७ सी.जी.५७४३ व एम.एच.१६बी.के.४४३४ जप्त केल्या आहेत. फिर्यादीत फरार दाखविण्यात आलेला आरोपी वडाळा बहिरोबा येथील कोविड सेंटरचा संचालक आहे. त्याच्या अटकेनंतर मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. फरार आरोपीचे नाव शनिशिंगणापुर पोलिस लपवत आहेत.

गावात अर्थपूर्ण तडजोडीची चर्चा

कोरोना संसर्गाच्या या महामारीत आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. परिस्थितीचा फायदा घेवून सुरू असलेल्या काळाबाजाराबद्दल नाराजीचा सूर आहे. वडाळा येथील चार आरोपीस अटक करण्यात आल्यानंतर समाधान व्यक्त होत आहे. एका जणास जाणीवपूर्वक फरार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(Director of the Covid Center, which illegally sells remedivir)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT