श्रीगोंदा बाजार समिती 
अहिल्यानगर

श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक उमेश पोटे अपात्र

संजय आ. काटे

श्रीगोंदे : येथील बाजार समितीचे व्यापारी संचालक उमेश पोटे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता.

भोस यांच्या तक्रारीनुसार, पोटे यांनी व इतर लिंबू व्यापारी यांनी बाजार समितीमध्ये लिलाव न करता मागील सुमारे दोन वर्षापासून बेकायदेशीर लिंबू खरेदी केली. त्यातुन बाजार समितीचे नुकसान केले. व्यापाऱ्यांना हाताशी धरुन त्यांचे नेतृत्व करत संप सुरु केला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार पणन (विकास व विनियमन) अधिनियमातील तरतुदीच्या विसंगत वर्तन व शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली. संचालक पदास अशोभनियवर्तन केले. बाजार समितीच्या हिताविरुध्द वर्तन केले. त्यामुळे त्यांचे चौकशी होऊन अधिनियमाप्रमाणे कार्यवाही होऊन त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी होती. (Director of Shrigonda Market Committee Pote ineligible)

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी बाजार समितीचे दप्तर तपासणी करुन जिल्हा उपनिबंधक यांना अहवाल सादर केला.

या अहवालात पोटे यांनी बाजार समितीचे कायद्यातील नियम पालन केलेले नसून वेळोवेळी केलेल्या व्यवहारा वरील महसूल बुडविलेला आहे. कोरोनाचे कारण पुढे करुन पोटे यांनी लिलाव बंद करुन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केलेले आहे. त्यांनी बाजार समितीकडून घेतलेल्या गाळ्याचे भाडे संचालक पदाचा गैरवापर करुन वेळेवर भरलेले नाही.

संचालक पदाचा वापर करुन चुकीचे रेकॉर्ड तयार करुन मार्केट फी व सुपरव्हीजन फी बुडविलेली आहे. बाजार आवाराबाहेर काटा लावून लिंबू खरेदी करुन व परजिल्ह्यातील खरेदी केलेला लिंबू माल गाळ्यावर आणून पँकिंग करुन इतर ठिकाणी पाठवून त्याची कुठलेही नोंद बाजार समितीस दिलेली नाही. सुनावणी नंतर पोटे यांना अपात्र ठरविण्यात आले.

संचालक उमेश पोटे यांचा गैरकारभार सिद्ध झाल्याने त्यांचे संचालकपद रद्द झाले. आता बाजार समितीमध्ये अनेक विषयात गैरकारभार झाला आहे. तो सिद्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- टिळक भोस, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड .

बाजार समिती कसा व कोण किती भ्रष्टाचार करते व कोण कुणाला ब्लॅकमेल करते, याची मला माहिती आहे. सगळे संचालक एकत्र असून विरोधक कुणी नाही. या निकालाबाबत आपल्याला काहीच म्हणायचे नसून संचालक राहण्यात रस नसून आपण अपिलही करणार नाही.

उमेश पोटे, अपात्र ठरवलेले संचालक, श्रीगोंदा.

(Director of Shrigonda Market Committee Pote ineligible)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT