Director of Tanpure factory in the field for sugarcane 
अहिल्यानगर

वो बागायतदार, कारखान्याला ऊस द्या ना... तनपुरेचे संचालक फिरताहेत बांधावर

विलास कुलकर्णी

राहुरी : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मागील चार दिवसांपासून ऊस उत्पादकांच्या बांधावर फिरत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. "यंदा सहा लाख टन ऊसाचे गाळप करायचे आहे. कारखान्याला ऊस द्या. उसाला चांगला दर मिळेल." असे आवाहन संचालकांतर्फे केले जात आहे. त्यास, शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

मागील वर्षी ऊस टंचाईमुळे कारखान्याचा गाळप हंगाम बंद राहिला. मागील वर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाला. मुळा धरण ओसंडून वाहिले. विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी वाढली. शाश्वत पाणी असल्याने शेतकऱ्यांनी डिसेंबर 2019 पासून मार्च 2020 दरम्यान सुरू ऊस पिकाच्या मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या. त्यामुळे येत्या हंगामासाठी तालुक्यात 12 हजार हेक्टर ऊस आहे. त्यापासून दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. कारखान्याची आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी सर्व संचालकांना आवाहन केले. त्यामागे शेतकऱ्यांच्या अपेक्षा, प्रतिसाद, उसाची परिस्थिती समाजावी, असा उद्देश आहे. त्यानुसार मागील चार दिवसांपासून संचालक कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, संवाद साधत आहेत. 

दोन वर्षांपूर्वी गाळप केलेल्या उसाची राहिलेली एफआरपी प्रमाणे रक्कम मिळावी. या वर्षी उसाला किती भाव मिळेल. उसाची तोडणी वेळेत होईल काय? त्यासाठी आवश्यक ऊस तोडणी मजूर आहेत काय? असे विविध प्रश्न शेतकऱ्यांमधून संचालकांना विचारले जात आहेत. संचालकांतर्फे शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

"तनपुरे कारखाना तालुक्याची कामधेनु आहे. आगामी दोन वर्षे कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर ऊस आहे. जिल्ह्यात सर्व कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस आहे. त्यामुळे, इतर कारखाने राहुरीतून ऊस नेण्याची शक्यता नाही. या वर्षी उसाला चांगला भाव मिळेल. मागील ऊसाची एफआरपीप्रमाणे थकबाकी दिली जाईल. अशी खात्री दिल्यावर शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- रवींद्र म्हसे, संचालक, तनपुरे साखर कारखाना. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : आंदोलक विद्यार्थ्यांशी वागताना संयम आणि सावधगिरी बाळगायला हवी, सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

Jalna District Bank: जालना जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी राहुल लोणीकर; व्हाईस चेअरमनपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड

Career Guide: नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे? जाणून घ्या कोर्सेस, पात्रता, NEET आणि प्रवेश प्रक्रिया!

Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT